coronavirus: कडा येथील जनावरांच्या बाजारात तोबा गर्दी; ना मास्क, ना सोशल डिस्टंसिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 02:14 PM2021-02-21T14:14:57+5:302021-02-21T14:15:54+5:30

coronavirus News: आष्टी तालुक्यातील कडा येथील कृ.उ.बा समिती आवारात दर रविवारी आठवडी बाजार भरतो. आता कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने प्रशासनाने नियमावली तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या

coronavirus: crowd at the cattle market at Kada; No masks, no social distinctions | coronavirus: कडा येथील जनावरांच्या बाजारात तोबा गर्दी; ना मास्क, ना सोशल डिस्टंसिंग

coronavirus: कडा येथील जनावरांच्या बाजारात तोबा गर्दी; ना मास्क, ना सोशल डिस्टंसिंग

Next

कडा ( बीड ) : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने होत असल्याने कोरोनाला अटकाव आणता यावा व कोरोना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने नियमावली जारी केली असली तरी ती फक्त कागदावरच असल्याचे चित्र आष्टी तालुक्यातील कडा येथे रविवारी भरणाऱ्या कृ.उ.बा आवारातील बैल बाजारात दिसुन आले. ना मास्क ना सोशल डिसटन यामुळे कोरोनाचा धोका वाढु शकतो याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बाजार समिती प्रशासनावर नियम पाळण्याची हयगय केल्या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी शिवक्रांतीचे युवक प्रदेश अध्यक्ष दिपक सोनवणे यांनी केली आहे. 

आष्टी तालुक्यातील कडा येथील कृ.उ.बा समिती आवारात दर रविवारी आठवडी बाजार भरतो. आता कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने प्रशासनाने नियमावली तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या असुन गर्दी जमवु नये, त्याच बरोबर मास्क, सोशल डिसटन असावे याची जनजागृती करून देखिल कडा येथील आठवडी बैल बाजारात बाहेरील जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणावर जनावर, शेळ्या खरेदी विक्रीसाठी येतात, व्यापारी, शेतकरी देखील असतात. पण आता कृ.उ.बा समितीने कसलीच जनजागृती किंवा नियमावली दिली नसल्याने तोबा गर्दीचे चित्र पहावयास मिळाले.

नियमाकडे  कानाडोळा करून हयगय करणार्‍यांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी दिपक सोनवणे यांनी केली आहे.  याबाबत आष्टी येथील तहसीलदार राजाभाऊ कदम यांना विचारणा केली असता ते म्हणाले की वैयक्तिक कोणाला सुचना दिल्या नाहीत. अस काही असेल तर तसे त्यांना मास्क वापरायला सांगु असे त्यांनी लोकमतला सांगितले. 

Web Title: coronavirus: crowd at the cattle market at Kada; No masks, no social distinctions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.