CoronaVirus : ३०० रुपयात अत्यावश्यक सेवेचा बनावट पास; लॉकडाऊनमध्ये तरुणाचा कारनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 08:00 PM2020-04-11T20:00:36+5:302020-04-11T20:01:30+5:30

बनावट पास तयार करुन विक्री करणे आले अंगलट 

CoronaVirus: fake pass for 300 rupee of essential service; The young man's actions in lockdown | CoronaVirus : ३०० रुपयात अत्यावश्यक सेवेचा बनावट पास; लॉकडाऊनमध्ये तरुणाचा कारनामा

CoronaVirus : ३०० रुपयात अत्यावश्यक सेवेचा बनावट पास; लॉकडाऊनमध्ये तरुणाचा कारनामा

googlenewsNext

दिंद्रुड : बीड जिल्हा हद्दीत अत्यावश्यक सेवा देण्यासाठी पोलिसांनी ऑनलाईन पास देणे सुरू केले आहे. याचाच गैरफायदा एका तरुणाने घेत फोटो आणि गाडी नंबर बदलून बनावट पास तयार केल्याचे उघडकीस आले आहे. महेश अशोक फपाळ असे आरोपीचे नाव असून दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक वृत्त असे की, कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन असून संचारबंदी आहे. या दरम्यान, जिल्हा अंतर्गत अत्यावशक सेवेसाठी बीड जिल्हा पोलिसांनी आॅनलाईन पास उपलब्ध केल्या आहेत. या पासला छेडछाड करत नाव व गाडी नंबर बदलत बेलुरा येथिल महेश अशोक फपाळ (वय २१ वर्ष) हा तरुण बनावट पास बनवत होता. ही तो केव ३०० रुपयात विक्री करत असे. बेलुरा येथिल दसाई मोतीराम फपाळ यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी दिंद्रुड पोलिसात तक्रार करत केली. यानंतर सपोनि अनिल गव्हाणकर यांनी महेश फपाळ यास तात्काळ अटक करत मोबाईल जप्त केला आहे. आरोपी महेश अशोक फपाळ याने किती जणांना बनावट पास बनवुन दिला आहे याचा तपास करीत असल्याचे सांगितले. दरम्यान साई मोतीराम फपाळ याच्या फिर्यादी वरुन गुन्हा नंबर ७८/२०२० कलम ४२०,४६५,४६८ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: CoronaVirus: fake pass for 300 rupee of essential service; The young man's actions in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.