coronavirus : बीडमध्ये महिला अधिकारी, पीडितेसह २६ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३०५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 11:21 AM2020-07-17T11:21:48+5:302020-07-17T11:22:12+5:30

जिल्ह्यात १४५ कोरोनामुक्त झाले असून १२ जणांचा मृत्यू झालेला आहे. 

coronavirus: female officer in Beed, 26 positive with rape victim; 305 patients | coronavirus : बीडमध्ये महिला अधिकारी, पीडितेसह २६ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३०५

coronavirus : बीडमध्ये महिला अधिकारी, पीडितेसह २६ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३०५

googlenewsNext

बीड : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील एक उच्चपदस्थ महिला अधिकारी, एका गुन्ह्यातील पीडितेसह २६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३०६ झाली आहे. पैकी १४५ कोरोनामुक्त झाले असून १२ जणांचा मृत्यू झालेला आहे. 

येथे आढळले नवीन रुग्ण
बीड शहरातील चंपावती नगर १, अजमेरनगर बालेपीर १, युसूफिया मस्जिदजवळ शाहुनगर १, जुना बाजार २, बीड तालुक्यातील घोसापारी १, लिंबा (रूई) २ व अन्य १, गेवराई तालुक्यातील मादळमोही १, आष्टी तालुक्यातील गंगादेवी १, माजलगाव तालुक्यातील १, अंबाजोगाई शहरातील चनई १,  परळी शहरातील इंद्रानगर २, जुने रल्वेस्टेशन जवळ ९, भोई गल्ली १ तसेच शिरूर तालुक्यातील सवसवाडी १ असे नवीन २६ रुग्ण आढळले आहेत.

Web Title: coronavirus: female officer in Beed, 26 positive with rape victim; 305 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.