CoronaVirus : सोशल डिस्टनसिंगचे उल्लंघन करत बँके बाहेर गर्दी झाल्याने मॅनेजरवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:41 PM2020-04-15T17:41:09+5:302020-04-15T17:42:28+5:30

ग्राहकांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन न करता गर्दी केली

CoronaVirus: FIR against Bank Manager for causing crowds over violations of social distancing in Gevarai | CoronaVirus : सोशल डिस्टनसिंगचे उल्लंघन करत बँके बाहेर गर्दी झाल्याने मॅनेजरवर गुन्हा दाखल

CoronaVirus : सोशल डिस्टनसिंगचे उल्लंघन करत बँके बाहेर गर्दी झाल्याने मॅनेजरवर गुन्हा दाखल

Next

गेवराई :- सध्या कोरोना साथ रोग पसरण्याचा संभव असतांना व लोकाच्या जिवीतास धोका असतांना व सोशल डिस्टन्स न ठेवता येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅकेत बुधवार रोजी सकाळी 8.30 वाजता गर्दी जमवल्या प्रकरणी येथील बॅक मॅनेजर वर गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जगभरात सध्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असुन याला आळा घालण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असुन यात कोरोना रोग पसरण्याचा संभव असतांना व लोकांच्या जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असतांना देखील येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅकत जमणा-या गर्दीत सोशल डिस्टन्स राहावा या करिता उपाययोजना केल्या नाहीत व शासनाचे आदेशाचे उल्लघन केले म्हणून  येथील बॅक मॅनेजर जगन्नाथ मदनराव सोनमाळी वय 50 राहणार गेवराई याच्यां विरूद्ध बुधवार रोजी सकाळी गेवराई पोलीस ठाण्यात पोलीस नारायण महादेव खटाने याच्यां फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: CoronaVirus: FIR against Bank Manager for causing crowds over violations of social distancing in Gevarai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.