CoronaVirus : पोलिसांसोबत हुज्जत घालणे डॉक्टरला पडले महागात, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 03:12 PM2020-04-03T15:12:33+5:302020-04-03T15:15:34+5:30
शासकीय कामकाजात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
अंबाजोगाई-:राज्य राखीव दलाच्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक वाद व त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबाजोगाई येथील डॉ. नितीन राजाराम पोतदार याच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेमुळे शहरात चर्चेला उधान आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ७ ते ९.३० ही वेळ खरेदीसाठी ठेवण्यात आली आहे. इतर वेळी कोणीही घराबाहेर येऊ नये. असे शासकीय आदेश आहेत. असे असतांनाही गुरुवारी रात्री येथील डॉ. नितीन पोतदार यांनी आपल्या कारमधून फिरतांना राज्य राखीव दलाच्या कर्मचा-यांनी त्यांना शिवाजी चौकात अडवले व त्यांची चौकशी सुरू केली.
यावेळी पोतदार यांनी उपस्थित पोलिस अधिका-यांना तुम्हाला नौकरी करायची का? मी सैन्यदलातला मोठा अधिकारी आहे. तुम्हाला बघून घेतो. असे म्हणत उपस्थित पोलिस अधिका-यांशी हुज्जत घातली. त्यांना शिवीगाळ करून शासकीय कामकाजात अडथळा आणला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिीरक्षक अशोक प्रधान यांच्या फिर्यादीवरून डॉ. नितीन पोतदार यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.