आनंदाची बातमी; धनंजय मुंडे यांच्या संपर्कातील जिल्हाधिकारी यांच्यासह अधिष्ठातांचा रिपोर्ट निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 08:36 AM2020-06-15T08:36:21+5:302020-06-15T08:47:59+5:30
बीडचे जिल्हाधिकारी, अंबाजोगाई मेडिकल कॉलेज चे अधिष्ठाता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा
बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आल्यामुळे बीडचे जिल्हाधिकारी, अंबाजोगाई मेडिकल कॉलेज चे अधिष्ठाता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रविवारी रात्री स्वॅब घेतले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. ही माहिती खुद्द जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
अंबाजोगाई येथील प्रयोगशाळा उद्घाटन कार्यक्रमात पालकमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. याच कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. पालकमंत्री मुंडे यांचा मुंबईमध्ये स्वॅब घेतल्यानंतर ते पॉझिटिव्ह आले. त्यांनतर बीड मध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन केले. काहींचे अगोदरच स्वॅब घेतले होते. रविवारी रात्री जिल्हाधिकारी, अंबाजोगाईचे अधिष्ठाता यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वॅब घेतले होते. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 88 रुग्ण सापडले असून पैकी 2 मयत झाले आहेत. 64 कोरोनामुक्त झालेले असून 22 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.