CoronaVirus : नातवासह आजीची फरफट; रोजगार नसल्याने शिळ्या भाकरीचे तुकडे खाऊन दिवस काढण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 06:56 PM2020-04-18T18:56:20+5:302020-04-18T18:58:01+5:30
नातवाला पोटाचा विकार झाल्याने दोघेही हतबल झाले आहेत
- अनिल महाजन
धारूर : तालूक्यातील चौंडी येथील आजी व नातू साध्या पञ्याचे शेडमध्ये राहून कसे बसे जिवन जगतात. मात्र अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटा मुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यातच शिळ्या भाकरीचे तुकडे वाळवून तेच खाऊन कसे बसे जिवन जगत असताना नातवाला पोटाचा विकार झाल्याने पैशा अभावी उपचार घेता येत नसल्याने हतबल असल्याची करुण कहाणी अश्रू ढाळत आजी सांगत होती.
तालूक्यातील चौंडी येथील रुक्मीन विश्वनाथ अडागळे या पुणे येथे आपल्या कुंटूंबासह राहत होत्या. मोठा मुलगा आठ वर्षापूर्वी अपघातात मरण पावला लहान मुलगा व सुन निधन झाले. तर पतीचे दिड वर्षा पुर्वी निधन झाले पुणे येथे राहून जिवन जगणे मुश्कील झाले . यामुळे गावाकडे धारूर तालूक्यात चोंडी येथे येऊन रहाणे पंसद केले. सोबत मोठ्या मुलाचा एक मुलगा बाबू महादेव अडागळे हा आठवीत गावातच शिक्षण घेत आहे तर दोन मुली निवासी आश्रम शाळेत पुणे जिल्ह्यात शिक्षण घेतात आहेत.
स्वतःचे घर नाही पण पञ्याच्या शेडमध्ये राहून मजूरी करून आपला व नातवाचा उदरनिर्वाह भागवत होती. आठवीत शिकणारा बाबू शाळा शिकत सुट्टीच्या काळात एखादे काम करून आपल्या आजीला मदत करत असे . गावात घर नाही शिधापञीकेवर फक्त आजीचच नाव,यामुळे महिन्यास मिळणारे थोडे धान्य याचाच आधार त्यांना आहे. अशा गंभिर परीस्थितीत जिवनातील एकएक दिवस काढत असताना कोरोनाचे संकट आले व कामधंदा बंद झाला. कुंटूंबाच पोट कस भागवाव गंभिर प्रश्न आशा परीस्थीतीत नातू बाबूचे पोटात दुखू लागले. दवाखाण्यात न्यायला पैसे नाहीत, गोळा केलेल्या शिळ्या भाकरी वाळवून खाऊन दिवस काढत आसताना दवाखाना मागे लागला. आजी रुक्मीनबाई दोन दिवसापासून धारूरला नातवासह चकरा मारत आहे. हि बाब ग्रामसेवक विजय गायसमूर्रे व सकल मराठा समाजाचे अतूल शिनगारे यांच्या निदर्शनास आली त्यांनी शिवभोजन थाळीचे जेऊ घालून नातवाला धारूर ग्रामीण रुग्नालयात दाखवले प्राथमीक उपचार केले. मात्र ही करुण कहाणी ऐकतान अंगावर शहारे उभे राहत होते.