CoronaVirus : कर्तव्याला सलाम ! चिमुकल्याला गावी पाठवून बीडचे कोरोना वॉरियर्स पुण्यात देताहेत लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 01:42 PM2020-04-13T13:42:03+5:302020-04-13T13:43:24+5:30

 पाटोद्यातील मुगगावच्या भवर दाम्पत्याची रुग्णसेवा

CoronaVirus: Greet the duty! Fight the Beed's Corona Warriors in Pune by sending the girl child to the village | CoronaVirus : कर्तव्याला सलाम ! चिमुकल्याला गावी पाठवून बीडचे कोरोना वॉरियर्स पुण्यात देताहेत लढा

CoronaVirus : कर्तव्याला सलाम ! चिमुकल्याला गावी पाठवून बीडचे कोरोना वॉरियर्स पुण्यात देताहेत लढा

Next
ठळक मुद्देमला तिकडे घेऊन जा...चिमुकलीची हाकशासनाच्या प्रयत्नांना साथ द्या

बीड : मुळचे मुगगाव (ता.पाटोदा) येथील रहिवाशी असलेले भवर दाम्पत्य सध्या पुण्यात कोरोनाविरूद्ध लढा देत आहे. दोघेही पती,  पत्नी आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करतात. या विषाणूचे गांभीर्य पाहता त्यांनी आपला तीन वर्षाच्या पोटच्या गोळ्याला गावी पाठविले. कुटूंबापासूनही हे दाम्पत्य दुरावले. बीडचे हे वॉरियर्स सध्या पुण्यात तत्परतेने रुग्णसेवा देत आहेत. त्यांच्या कार्याला सर्वस्तरातून सलाम केला जात आहे. 

मीरा (वय २८) आणि त्यांचे पती सुरेश त्रिंबक भवर (वय ३२) हे  दाम्पत्य २०१० पासून पुण्यात राहात आहे. मीरा या पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात परिचारिका आहेत. तर, सुरेश हे पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालयात परिचारक आहेत. सध्या हे दोघेही कोरोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या कक्षात नेमणुकीस आहेत. दोघांचाही कोरोनाग्रस्त रुग्णांशी निकटचा संपर्क येतो. रुग्णांचे मनोधैर्य वाढविणे, त्यांना वेळेत औषधे देणे, त्यांना हवे नको पाहणे, रुग्णांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या प्रगतीचा अहवाल तयार करण्याचे काम हे दोघेही या कक्षांमध्ये करतात.

सुरेश यांनी लातूरच्या अहमदपूर येथून नर्सिंगचा कोर्स केला. त्यानंतर ते २०१० साली पुण्यात आले. त्यांनी सुरुवातीला खासगी रुग्णालयात काम केले. त्यानंतर त्यांनी २०१४ साली पालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी मिळाली. त्यानंतर पाटोदा तालुक्यातीलच चुंबळी या गावच्या मीरा यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्यांनीही नर्सिंगचे प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यांना वायसीएम रुग्णालयात परिचारिकेची नोकरी मिळाली. सुरेश यांचा भाऊ रुबी हॉल रुग्णालयात लॅब असिस्टंट आहे, तर वहिनी सुद्धा परिचारिका आहेत. संपुर्ण भवर कुटुंब रुग्णसेवा करीत आहे. 

साधारणपणे डिसेंबर-जानेवारीपासूनच डॉ. नायडू रुग्णालयात विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या तपासणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये दुबई, चीनवरुन आलेल्या रुग्णांचा अधिक समावेश होता. ९ मार्च रोजी सिंहगड रस्त्यावरील दाम्पत्य पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. दोघांनाही आपापल्या रुग्णालयातील कोरोना कक्षामध्ये (आयसीयू) ड्यूटी असल्याने त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलाला काळजावर दगड ठेवत मीरा यांच्या मावशीकडे पाटोदा येथे पाठवून दिले. त्यानंतर हे दोघेही पूर्ण समर्पित भावनेने कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेत काम करीत आहेत. 

कोरोनामुळे सर्वत्र ‘लॉकडाऊन’ असल्याने लोकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. आपण आणि आपला परिवार सुरक्षित राहावा याकरिता प्रत्येकजण काळजी घेत आहे. परंतू, स्वत:च्या कुटुंबाचा आणि वैयक्तिक सुखाचा विचार न करता हे ‘कोरोना वॉरीयर्स’ अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्या दोघांना एकमेकांना वेळही देत येत नाही की नीट संवादही होत नाही. सामंजस्य, समजूदारपणा आणि एकमेकांच्या कर्तव्याची जाणिव ठेवत हे दाम्पत्य कोरोनाशी लढा देत आहे. 

मला तिकडे घेऊन जा... चिमुकल्याची हाक 
कोरोनाचा पुण्यातील पहिला रुग्ण आढळल्यावर आम्हाला भविष्यातील परिस्थितीचा अंदाज आला होता. त्यामुळे मुलाला गावी पाठविले. त्याला फोन करायचे आम्ही टाळतो आणि व्हिडीओ कॉल तर शक्यतो नाहीच करीत. कारण, व्हिडीओ कॉल केला की त्याला पाहून रडू कोसळते. मग तो सुद्ध  ‘मला तिकडे घेऊन जा’ असे म्हटला की काळजात कालवाकालव होते. गावाकडून आईवडील-सासूसासरे, भाऊ बहिणी, नातेवाईक सतत फोन करुन काळजीने विचारपूस करीत असतात. सर्वजण आमचे मनोधैर्य वाढवितात असेही दोघे म्हणाले. 

शासनाच्या प्रयत्नांना साथ द्या
सर्व डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय कर्मचा-यांसह आम्हीही वैयक्तिक सुखाला बाजूला ठेवले आहे. आम्ही कोरोनाला घाबरत नाही. रुग्ण बरे झाले पाहिजेत आणि देश जिंकला पाहिजे हीच आम्हा सर्वांची भावना आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिका, पोलीस, प्रशासन आणि शासनाच्या निदेर्शांचे पालन करावे. सोशल डिस्टन्सिंग राखावे. नागरिकांनी प्रामाणिकपणे शासनाच्या प्रयत्नांना साथ दिली तर कोरोनावर निश्चित विजय प्राप्त करता येईल.
 - मीरा आणि सुरेश भवर

Web Title: CoronaVirus: Greet the duty! Fight the Beed's Corona Warriors in Pune by sending the girl child to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.