CoronaVirus : अंबाजोगाईत कोरोना योद्धयांचा सन्मान; स्वच्छता कामगारांचे पाय धुऊन व्यक्त केली कृतज्ञता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 06:11 PM2020-04-16T18:11:48+5:302020-04-16T18:12:09+5:30
शहरातील रविवार पेठेतील नागरिकांचा उपक्रम
अंबाजोगाई-: शहरवासीयांच्या सेवेसाठी स्वतः च्या जीवाची तमा न बाळगता शहर स्वच्छ ठेवण्यात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त करत त्यांची पाय धुऊन व टॉवेल-टोपी व पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला.हा उपक्रम रविवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते रमाकांत शेलमूकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊन मध्ये सर्वजण आपल्या कुटुंबासह आनंद घेत आहेत.मात्र अशा स्थितीतही अंबाजोगाई नगर परिषदेचे स्वछता कामगार दररोज शहर स्वच्छ ठेवत आहेत.स्वछता विभागातील कर्मचारी आपल्या जीवाची तमा न बाळगता नाल्या काढणे,साफ सफाई,शहर फवारणी अशी विविध कामे सातत्याने सुरूच आहेत.या कामगारांच्या कामाची दखल रविवार पेठेतील रहिवाश्याणी घेतली.स्वछता कामगारांना खुर्चीत बसवुन त्याचे पाय धुतले.त्यांना टॉवेल-टोपी चा आहेर व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करत कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमाकांत शेलमूकर,अंजली शेलमूकर,प्रवीण शेलमूकर,प्रशांत शेलमूकर,सतीश दहातोंडे व या परिसरातील रहिवाशांचा पुढाकार होता.या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
प्राधान्यक्रमाने स्वछता सुरू
अंबाजोगाई शहरात सर्व प्रभागात दैनंदिन स्वछता सुरू आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राधान्यक्रम देऊन कामे सुरू आहेत. संपूर्ण शहर फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.आगामी काळात हि हे काम सुरूच राहील.
- अनंत वेडे, स्वछता निरीक्षक,अंबाजोगाई.