CoronaVirus: नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी बालिश राजकारण केले जातेय- जयदत्त क्षीरसागर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 05:09 PM2020-04-05T17:09:42+5:302020-04-05T17:10:16+5:30

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी क्षीरसागर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या आरोपाला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उत्तर दिलं आहे.

CoronaVirus: Instead of solving the problems of the citizens, childish politics is being done - jaydutt Kshirsagar vrd | CoronaVirus: नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी बालिश राजकारण केले जातेय- जयदत्त क्षीरसागर

CoronaVirus: नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी बालिश राजकारण केले जातेय- जयदत्त क्षीरसागर

Next

बीड : मला शासकीय नियमांची पूर्ण जाणीव होती. त्यामुळे औरंगाबाद येथे अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन बीड जिल्ह्यात आलो आहे.  शनिवारी जयदत्त क्षीरसागर हे औरंगाबादवरून बीडला आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी क्षीरसागर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या आरोपाला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी काळात शेतकरी, कष्टकरी व इतर शहरवासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र या काळात देखील काही जण बालिश राजकारण करत आहेत. दरम्यान, ऊसतोड कामगार व हातावर पोट असणाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे त्यांची व्यवस्था प्रशासनाकडून योग्य पद्धतीने केल जात आहे का, याच्यावर आमचे लक्ष असणार आहे. तसेच  जिल्ह्यातील परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलणार असल्याचे क्षीरसागर यावेळी म्हणाले.

Web Title: CoronaVirus: Instead of solving the problems of the citizens, childish politics is being done - jaydutt Kshirsagar vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.