CoronaVirus : उसतोड मजुरांना गावी पोहचले तरी घराबाहेरच राहावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 02:28 PM2020-04-19T14:28:26+5:302020-04-19T14:33:52+5:30
जिल्हा परिषदेसह महसूल, कृषी यंत्रणेवर जबाबदाऱ्या निश्चित उसतोड मजुरांना स्वगृही जाण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी निर्णय घेतल्यानंतर निर्देशानंतर स्थानिक प्रशासनाने व्यवस्थापन सुरु केले आहे.
बीड : कोरोनामुळे लॉकडाऊन कालावधीत कारखान्यांवर अडकलेल्या तसेच प्रवासादरम्यान संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल उसतोड मजुरांना स्वगृही जाण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी निर्णय घेतल्यानंतर निर्देशानंतर स्थानिक प्रशासनाने व्यवस्थापन सुरु केले आहे. उसतोड मजुर त्यांच्या गावी पाहेचले तरी क्वारंटाईन कालावधीपर्यंत घराबाहेरच राहावे लागणार आहे. मात्र घरचे जेवण त्यांना घेता येणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी सायंकाळी जारी केलेल्या दिशा निर्देशानुसार त्या- त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा व आरोग्य सेविक, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, कृषी सेवक, मंडळ कृषी अधिकारी व इतर सर्व विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे दोन उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महसूलचे नायब तहसीलदार व रोहयोच्य उपजिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
गावामध्ये बोहरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या उसतोड कामगारांना ओळख पटवून प्रवेश देणे, इतर गावातील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश न देणे, मजुरांची संख्या विचारात घेऊन त्यांना त्यांच्या किंवा इतरांच्या शेतावर राहण्यासाठी पाठविणे, ज्यांची व्यवस्था होऊ शकत नसेल तर त्यांना गावातील शाळेत राहू देणे, परंतू कोणत्याही परिस्थितीत त्यांना त्यांच्या घरात अथवा गावठाणामध्ये राहू न देणे, सदर मजूर गावी पोहचल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित कारखाना, ज्या जिल्ह्यात आहे तेथील जिल्हाधिकारी तसेच बीड जिल्हाधिकाऱ्याांना शिक्षण विस्तार अधिकाऱ्यमार्फत सद्त्सेच मजूर गावात आल्यानंतर त्यांच्या परिवारामार्फत भोजन व्यवस्था करुन घेण्याची जबाबदारी गावच्या सरपंचांवर सोपविण्यात आली आहे. या कामांचे नियंत्रण उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) यांच्याकडे राहणार आहे.
मजुरांच्या निवासाच्या ठिकाणी शुद्ध पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, शौचालय, स्वच्छता व इतर आवश्यक सुविधा तसेच किराणा सामान, भाजीपाला पोहचविण्यासाठी उपाययोजनेची जबाबदारी ग्रामसेवकांवर देण्यात आली असून दैनंदिन अहवाल त्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्याकडे द्यावा लागणार आहे. ग्रामसेवक, ग्रामपंचायत व गावपातळीवरील कर्मचाºयांशी समन्वय साधून मजुरांना द्यावयाच्या सुविधेबाबत खात्री करणे, मजुरांना अनुज्ञेय असणारा धान्य पुरवठा दुकानदारामार्फत करण्याची जबाबदारी तलाठ्यांवर सोपविली आहे. उसतोड मजूर गावात आल्यानंतर विहित कालावधीसाठी क्वारंटाईन असल्याने त्यांच्याशी स्वत: संपर्क साधून कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करुन लाभ उपलब्ध करुन देण्याबाबत कृषी सेवक, मंडळ कृषी अधिकारी व इतर सर्व विभागाच्या अधिकाºयांना सुचित केले आहे. सर्व सरपंचांसोबत संनियंत्रण ठेवणे, व शिक्षण विस्तार अधिकाºयामार्फत सरपंचाकडील सर्व प्रमाणपत्र गोळा करण्यासाठी तसेच ग्रामसेवकांवर संनियंत्रण ठेवून ग्रामविस्तार अधिकाºयामार्फत ग्रामसेवकांचे अहवाल गोळा करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांवर स्वतंत्ररित्या जबाबदारी देण्यात आली आहे. तर तलाठ्यांचे नियंत्रण ठेवून त्यांच्याकडून दैनंदिन अहवाल प्राप्त करुन उपजिल्हाधिकाºयांकडे (रोहयो) सादर करण्याबाबत नायब तहसीलदारांना सूचित केले आहे.
आरोग्याबाबत काळजी घेणार
इतर जिल्ह्यातून आपल्या गावात आल्यानंतर इतर जिल्ह्यातून उसतोड कामगार गावात आल्यानंतर त्यांना कोविड -१९ च्या अनुषंगाने समुपदेशन करणे, माहिती देऊन अंगणवाडीच्या सेवा पुरविण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविली आहे. तर गावात आलेल्या प्रत्येक सर्व मजुरांची रोज एकदा प्रत्यक्ष तपासणी करणे, ताप, सर्दी, खोकला, शवसनाचा त्रास व न्युमोनियासारखी लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीची माहिती तात्काळ वैद्यकीय अधिकाºयांना कळविणे, महिला, गरोदर महिला, लहान मुलांच्या आरोग्यविषयक काळजी घेऊन कोविड- १९ च्या अनुषंगाने समुपदेशन करण्याची जबाबदारी आशा व आरोग्य सेवकांवर दिली आहे.
पोलीस पाटलांवरही जबाबदारी
सदर मजूर आपल्या गावात आल्यानंतर क्वारंटाईन कालावधी संपेपर्यंत रहिवासाच्या ठिकाणापासून इतरत्र जाणार नाहीत, कोणत्याही परिस्थितीत व कारणाने इतर लोकांच्या संपर्कात येणार नाहीत याची खात्री करण्याची जबाबदारी पोलीस पाटील व पोलीस कर्मचाºयांवर राहणार आहे. त्यांना सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व गावातील सर्व कर्मचारी आणि व्यक्तींनी सहकार्य करणे बंधनकारक राहणार आहे.