CoronaVirus: लॉकडाउनमुळे रोजगार हिरावला; अन्न-निवाऱ्यासाठी मजूर कुंटूंबाचा इंदापूर ते मानवत पायी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 04:15 PM2020-04-09T16:15:07+5:302020-04-09T16:19:48+5:30
जागो जागी मदत झाली, कधी पाण्यावर काढला दिवस
- अनिल महाजन
धारूर : इंदापूर येथे इमातीच्या बांधकामावर मजूरी करण्यासाठी गेलेल मानवत येथील अशोक अंबादास रेंगडे हे दोन मुले, पत्नीसह पायी घराकडे निघाले आहेत. कोरोना मुळे काम बंद झाल्याने मुळ ठेकेदार निघून गेला, यामुळे राहण्याखाण्याची चिंता निर्माण झाल्याने पंधरा दिवसांपासून हा खडतर प्रवास कुटुंब आणि साडूसह करत आहेत. या दरम्यानचे त्यांचे अनूभव ऐकताना अंगावर शहारे येतात. कधी उपाशीपोटी पाण्याचा घोट पिऊन तर कधी कोणी दिलीच मदत तर ती घेऊन मोठ्या आशेने हे कुटुंब घराकडे निघाले आहे.
कोरोना चे प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व अघाड्यावर उपाययोजना कठोरपणे करत आहे. लाॕकडाऊनमुळे हातावर पोट असणारा मजूर वर्ग माञ त्रस्त होऊन गेला आहे. उदरनिर्वाहसाठी स्थंलातरीत झालेले मजूर तर अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. अशीच परिस्थिती मानवत येथील अशोक अंबादास रेंगडे यांच्यावर आली आहे. ते पत्नी व दोन लहान मुला सह इंदापूर जि पुणे येथे बांधकामावर चांगली मजूरी मिळते म्हणूण एक वर्षापूर्वी गेले होते. माञ कोरोनामुळे काम बंद झाले अन ठेकेदार निघून गेला. यामुळे कुंटूंबाचे उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला. याच काळात कामाचे शोधात त्यांचा साडू तिथे आला.
सर्व कुंटूंबाचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी मानवतला जायचे ठरवले. मात्र हातात पैसे नाहीत अन प्रवासाला वाहन नाही यामुळे हे पायीच घराकडे निघाले. सहपायपीट करत दोनशे पेक्षा जास्त किंमीचा प्रवास करत डोक्यावर संसार घेऊन पंधराव्या सोळव्या दिवशी धारूरला पोहचले.
मानवतला पोहचायला आणखी तिन ते चार दिवस लागणार आहेत. रस्त्यात जिथे निवारा मिळेल तिथे मुक्काम केला रस्त्यात ब-याच ठिकाणी लोकांनी खायला दिले माञ काही राञी पाणी पिऊन झोपावे लागले. कोरोनामुळे फक्त आपल्या मुळ गावात पोहचायचे एवढेच ध्येय समोर हे कुंटूब सर्व अडचणीवर मात करून प्रवास करत आहे. दरम्यान, हे कुंटूंब धारूर येथे आले असता राधेश्याम रहेवाल यांनी त्यांना जेवण देऊन पुढे पाठवले. येथे त्यांच्या प्रवासाची कहाणी व अनूभव ऐकतान माञ आंगावर शहारे उभे राहत होते