coronavirus : कंटेनमेंट झोनमध्ये लावले लग्न; वर-वधूला लग्नासोबत ‘कायद्याची बेडी...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 07:57 PM2020-08-12T19:57:10+5:302020-08-12T19:59:07+5:30

वधू- वर यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

coronavirus: marriage in the containment zone; fir against bride and groom | coronavirus : कंटेनमेंट झोनमध्ये लावले लग्न; वर-वधूला लग्नासोबत ‘कायद्याची बेडी...’

coronavirus : कंटेनमेंट झोनमध्ये लावले लग्न; वर-वधूला लग्नासोबत ‘कायद्याची बेडी...’

Next
ठळक मुद्देकडा परिसरात आतापर्यंत कोरोना बाधित रु ग्णांची संख्या १७ इतकी झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार कडा  कन्टेनमेंट क्षेत्र जाहीर

कडा : परिसरात कोरोना रु ग्णांची संख्या वाढू लागल्याने अनिश्चित काळासाठी कडा हे कन्टेनमेंट क्षेत्र जाहीर केलेले आहे. असे असताना संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करु न लग्न लावणाऱ्या वधू- वर यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

कडा परिसरात आतापर्यंत कोरोना बाधित रु ग्णांची संख्या १७ इतकी झाली आहे. त्यामुळे  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार कडा  कन्टेनमेंट क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. तरीही एका सुशिक्षित वर पित्याने आपल्या मुलाचा विवाह मंगळवारी आयोजित केला होता. याप्रकरणी पोलीस नाईक संतोष नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरून संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करणे, संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुरु  असताना पोलिसांना माहिती न देता विनापरवाना लग्न लावल्याबद्दल बीड येथील वधू आणि वरासह त्यांच्या आई-वडीलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
 

Web Title: coronavirus: marriage in the containment zone; fir against bride and groom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.