CoronaVirus: धारूरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस व पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 04:32 PM2020-04-04T16:32:27+5:302020-04-04T16:35:18+5:30

पोलीस व पत्रकारांच्या पुढाकारातून ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

CoronaVirus: Police and journalists' health check-up camp in the backdrop of Corona in Dharur | CoronaVirus: धारूरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस व पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर

CoronaVirus: धारूरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस व पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर

Next

धारूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ तास बंदोबस्तावर असणारे पोलीस कर्मचारी व पत्रकारांची आरोग्य तपासणी शनिवारी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. पोलीस व पञकार यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन कठोरपणे उपाय योजना करत आहे. यासाठी पोलीस कर्मचारी २४ तास सेवेत असतात. यावेळी त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पोलीस स्टेशन व पञकार यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामीण रुग्णालयाचे मदतीने आरोग्य शिबीर राबविण्यात आले. यात पोलीस व पञकार यांची आरोग्य तपासणी करत रक्त तपासणी करण्यात आली.

या अभिनव उपक्रमाची सुरूवात पोलीस निरीक्षक सुरेखा धस, नायब तहसीलदार तथा मुख्याधीकारी सुहास हजारे, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डाॕ चेतन आदमाने , डाॕ परेज शेख, सहायक पोलीस निरीक्षक कानीफनाथ पालवे यांच्या उपस्थित झाली. यावेळी दुष्यंत तिवारी , सत्पाल तोष्णीवाल यांच्यावतीने पोलीस व पत्रकारांना 'विटाॕमिन सी' च्या गोळ्या देण्यात आल्या. 

Web Title: CoronaVirus: Police and journalists' health check-up camp in the backdrop of Corona in Dharur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.