CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये तळीरामांची सोय करणाऱ्या अवैध दारूविक्री अड्ड्यावर पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 11:52 AM2020-04-06T11:52:55+5:302020-04-06T11:54:20+5:30
कारवाईत एक लाखाची हातभट्टी दारु जप्त
धारूर : लॉकडाऊन दरम्यान तळीरामांची सोय करणाऱ्या तालुक्यातील तांदळवाडी येथील एका वस्तीवरील अवैध हातभट्टी दारु विक्री अड्ड्यावर धारूर पोलिसांनी सोमवारी सकाळी ६.३० वाजता धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी तीन जणांना अटक केली असुन अंदाजे एक लाख रुपये पेक्षा जास्त किंमतीची हातभट्टी दारु जप्त केली आली आहे.
तालुक्यातील तांदळवाडी येथील पारधी वस्तीवर सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक गोविंद बास्टे यांच्या पथकाने पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पो.अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी धस, धारुर पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कारवाई केली. या कारवाईत जवळजवळ एक लाख पाच हजार रुपयांची हातभट्टी दारु आढळून आली. यावेळी आरोपी राम्या मोर्चा पवार, लक्ष्मण मोर्चा पवार, शेंड्या फुलचंद पवार यांना ताब्यात घेण्यात आले. तर शंभर लिटर रासायनिक दारुचे सहा बॕरेल नष्ट करण्यात आली.
या कारवाईत स.पो. उपनिरिक्षक बास्टे यांच्यासह पो.कॉ. टकले, पो.कॉ. माळेकर, पो.कॉ. राठोड व तीन होमगार्ड यांचा समावेश होता. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र अभिनंदन होत असुन शहरातही मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री होत असुन अशा प्रकारच्या कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे