coronavirus : संकटकाळात माणुसकीची जोपासना; रस्त्यावरील मनोरुग्णांची मानवलोकने केली भोजनाची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 04:30 PM2020-03-24T16:30:16+5:302020-03-24T16:44:16+5:30
संकटकाळात कोणी उपाशी राहू नये
- अविनाश मुडेगांवकर
अंबाजोगाई- "जगी ज्याशी कोणी नाही,त्यास देव आहे.निराधार आभाळाचा तोच भार आहे". या गीता च्या ओळी सार्थ ठरवणारे काम मानवलोक जनसहयोग करीत आहे.संचारबंदीत भूकबळी उदभवू नये याची दक्षता घेत जनसहयोग ने रस्त्यावरच्या मनोरुगनांची दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.
समाजातील उपेक्षितांना आधार देणाचे काम मानवलोक गेल्या ४०वर्षांपासून करीत आहे.जेष्ठ समाजसेवक डॉ द्वारकादास लोहिया यांच्या कार्याचा वारसा त्यांचे कुटुंबीय व संस्थेतील कार्यकर्ते पुढे अखंडीत चालवीत आहेत.शहर व परिसरात फिरणारे निराधार मनोरुग्ण,अपंग यांना कायमस्वरूपी जनसहयोग चा आधार आहे.त्यांची स्वछता,कपडे,उदरनिर्वाह यासाठी काम सुरूच असते.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी शहरात लागु आहे.प्रत्येकजण आपापल्या कुटुंबात व घरात बसून आहेत.अशा वेळी आपला जीव धोक्यात घालून रस्त्याच्या कडेला व शहरात इतरत्र राहणाऱ्या मनोरुणांना सर्वत्र असणाऱ्या बंद मुळे भीक ही उपलब्ध होत नाही.अशा स्थितीत त्यांची उपासमार होऊ नये म्हणून जनसहयोग चे कार्यकर्ते श्याम सरवदे,संजना आपेट,सावित्री सगरे,मारवाळ यांनी या मनोरुग्णांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करून देऊन त्यांची भूकबळी पासुन मुक्तता केली आहे.उदभवलेल्या प्रतिकुल स्थितीतही समाजातील उपेक्षितांसाठी माणुसकी दर्शवत मानवलोक जनसहयोग ने सामाजिक सदभाव जागृत ठेवला आहे.