CoronaVirus : कोरोना विरोधात बीड सज्ज; शहराची ८५ गटात विभागणी करून तपासणीला १८ पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 07:26 PM2020-04-15T19:26:14+5:302020-04-15T19:26:46+5:30

बीड पालिकेने केले सूक्ष्म नियोजन

CoronaVirus: ready to seed against Corona; Divide the city into 3 groups and inspect 3 teams | CoronaVirus : कोरोना विरोधात बीड सज्ज; शहराची ८५ गटात विभागणी करून तपासणीला १८ पथके

CoronaVirus : कोरोना विरोधात बीड सज्ज; शहराची ८५ गटात विभागणी करून तपासणीला १८ पथके

googlenewsNext
ठळक मुद्देएका गटात चार शेतकरी, दोन हातगाड्यांचा समावेश

बीड : सोशल डिस्टन्सींग ठेवण्यासह गर्दी टाळण्यासाठी आता यापुढे एका ठिकाणी बसून भाजीपाला विक्री करणे बंद केले आहे. यासाठी शहरात ८५ गटात विभागणी करून एका गटात चार शेतकरी व दोन हातगाडे वाल्यांना परवानगी दिली आहे. तसेच सर्वच प्रकारच्या दंडात्मक कारवायांसाठी १८ पथकांची नियूक्ती बीड पालिकेने केली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रस्त्यावर बसुन भाजीपाला विकण्यास बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनाकारण वाहने बाहेर आणण्यास बंदी घातली आहे. तोंडाला मास्क अथवा रूमाल न लावणे, १८ वर्षांखालील व ६० वर्षांपुढील नागरिकांना बाहेर येण्यास मज्जाव केला आहे. किराणा दुकानदारांनी दर्शनी भागात दरपत्रक लावणे आदी नियम घालण्यात आलेले आहे. हाच धागा पकडून बीड पालिकेने बीड शहरात नियोजन केले आहे. 
भाजी विक्रेत्यांसाठी शहरात ८५ मार्ग ठरवून दिलेले आहेत. एका मार्गावर किमान चार शेतकरी व दोन हातगाडेवाले असणार आहेत. तसेच या सर्व बाबींवर नजर ठेवण्यासाठी १८ पथकांची नियूक्ती केली आहे. याचे जबाबदारी सर्व स्वच्छता निरीक्षकांवर दिली आहे. एका निरीक्षकांकडे किमान ५० कर्मचारी असणार आहेत. 

मोबाईलमध्ये शुटींग करून कारवाई
जे लोक नियमांचे उल्लंघण करतील, अशांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले जाणार आहे. याचाच आधार घेऊन नंतर पोलिसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. एकदा दंड भरल्यानंतर पुन्हा आढळल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगर पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
बीड शहराची ८५ गटात विभागणी करून प्रत्येक गटात किमान चार शेतकरी व दोन हातगाडे वाले राहतील. सर्व घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघण करणाºयांवर कारवाईसाठी १८ पथके नियूक्त केली आहेत. नागरिकांनी दिलेल्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे.
- डॉ.उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद बीड

Web Title: CoronaVirus: ready to seed against Corona; Divide the city into 3 groups and inspect 3 teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.