coronavirus : बीडकरांना दिलासा; आजचे सर्वच रिपोर्ट निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 06:35 PM2020-06-16T18:35:39+5:302020-06-16T18:36:11+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ९० आहे.
बीड : कोरोना संशयित असलेल्या ८७ लोकांचे मंगळवारी स्वॅब घेतले होते. याचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वच रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बीडकरांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ९० झाली आहे. पैकी ६४ कोरोनामुक्त झाले असून दोघांचा मृत्यू झालेला आहे. अद्यापही २४ जणांवर बीड, औरंगाबाद, मुंबई व पुण्यात उपचार सुरू आहेत. याच रुग्णांच्या संपर्कातील आणि लक्षणे जाणवणाऱ्या नवीन संशयितांचे मंगळवारी स्वॅब घेतले होते. याचा अहवाल प्राप्त झाला असून ते सर्वच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य प्रशासनाकडून याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, केज तालुक्यातील माळेगाव येथील एका महिलेचा औरंगाबादमध्ये आज सकाळी मृत्यू झाला होता. त्याची अद्याप बीड जिल्ह्याच्या पोर्टलवर माहिती पडलेली नाही. त्यामुळे त्याची नोंद अद्याप जिल्ह्यात झाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.