CoronaVirus : बीडकरांना दिलासा; तीनही संशयितांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 04:06 PM2020-03-30T16:06:33+5:302020-03-30T16:07:24+5:30
बीडमध्ये दोन व अंबाजोगाईत एक संशयित आहे दाखल
बीड : बीड जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दोन व अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात एक अशा तीन संशयिंताचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीडमधून पाठविलेले आतापर्यंत सर्वच १४ अहवाल निगेटिव्ह आल्याने बीडकरांसाठी हा मोठा दिलासा राहिला आहे.
बीड व अंबाजोगाई येथे कोरोना संशयितांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेले आहेत. रविवारी बीडमध्ये दोन व अंबाजोगाईत एक असे तीन संशयित रुग्ण दाखल झाले होते. त्यांचे स्वॅब तपासणीला घेऊन प्रयोगशाळेत पाठविले होते. सोमवारी दुपारी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आतापर्यंत १४ संशयित रुग्ण आयसोलेशनमध्ये दाखल झाले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सुदैवाने आतापर्यंत बीडमध्ये एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. यापुढेही आढळू नये, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे.