CoronaVirus : बीडकरांना दिलासा; गेवराईतील ‘त्या’ मृताचा दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 08:43 PM2020-04-14T20:43:53+5:302020-04-14T20:44:59+5:30
दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने आता मृत्यूचे कारण शवविच्छेनानंतरच समोर येणार आहे.
बीड : औरंगाबादहून बीडमध्ये आलेल्या कोरोना संशयिताचा स्वॅब घेतला होता. हा स्वॅब सोमवारी निगेटिव्ह आला होता. परंतु सोमवारी रात्रीच्या सुमारास त्याची प्रकृती अचानक खालावली. त्याला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर घेण्यात आले होते. तरीही मध्य रात्री त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्याचा दुसºयांदा स्वॅब घेऊन पुण्याला पाठविला होता. दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ‘लोकमत’ला दिली.
औरंगाबाद येथे कंपनीत कामास असलेला ३८ वर्षीय व्यक्ती ५ एप्रिल रोजी गेवराई तालुक्यातील महारटाकळी या मूळ गावी आला होता. त्याला लक्षणे जाणवताच शनिवारी रात्री तो उप जिल्हा रुग्णालयात आला. तेथून जिल्हा रुग्णालयात रेफर करुन आयसोलेशन वॉर्डमध्ये रेफर केले. त्याला कोरोनाची जास्त लक्षणे असल्याने सर्वच चिंतेत होते. त्याला स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. सोमवारी सकाळी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतु रात्रीच्या सुमारास त्याची प्रकृती अचानक खालावली. मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी पुन्हा त्याचा स्वॅब घेऊन पुण्याला पाठविण्यात आला. याचा अहवालही सायंकाळी प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान, अंबाजोगाईतही स्वॅब निगेटिव्ह आलेल्या कामगाराचा मृत्यू झाला आहे. हा कामगार रोजगाराच्या शोधार्थ महाराष्ट्रात आला होता. बोअरवेल्सच्या गाडीवर काम करीत असतानाच तो आजारी पडला होता. त्यानंतर त्याला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते. मंगळवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.दरम्यान, दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने आता मृत्यूचे कारण शवविच्छेनानंतरच समोर येणार आहे.