CoronaVirus: धारूरमधील 'त्या' महिलेचा रिपोर्ट निगेटीव्ह; दोन दिवसांतील अफवेला पुर्णविराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:38 AM2020-04-22T11:38:53+5:302020-04-22T11:39:49+5:30
दोन दिवसांपासून धारूरमध्ये एक महिला पॉझिटिव्ह असल्याची अफवा
धारूर : गेल्या दोन दिवसांपासून शहर व तालुक्यात सुरु असलेल्या धारुरमध्ये एक महीला कोरोना पॉसिटिव्ह रुग्ण सापडल्याच्या अफवेला अखेर आज पुर्णविराम मिळाला असुन त्या रुग्णाचा अहवाल ही निगेटीव्ह आला असल्याचे डॉ. सचिन शेकडे यांनी सांगितले.
शहरात काल एका महीला रुग्णास कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची अफवा शहर व तालुक्यात झपाट्याने पसरली होती.धारूर ग्रामीण रुग्नलयातून अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले होते. यानंतर त्याांचा तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आला होता. या नमुन्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला असुन तो निगेटीव्ह असल्याची माहिती देण्यात आली.
यापुर्वीही शहर व तालुक्यातील ६ संशयितांचे स्वॕब नमुने तपासणीस पाठवण्यात आली होती. ती सर्व नमुने निगेटिव्ह आलेली आहेत. तालुका आरोग्य विभाग कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डाॕ चेतन आदमाने यांनी दिली