CoronaVirus : धक्कादायक ! परभणीतील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आले होते बीडमधील १२ लोक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 10:53 AM2020-04-17T10:53:43+5:302020-04-17T10:56:50+5:30
सर्वांना केले आयशोलेशन वार्डमध्ये दाखल
Next
बीड : परभणी येथे आढळलेला कोरोनाग्रस्त रुग्णाने बीड जिल्ह्यातून प्रवास केल्याचे उघड झाले आहे. मातोरी चेक पोस्टवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी, आरोग्य, शिक्षण, कृषी विभागाच्या लोकांसह 2 ग्रामस्थ असे 12 लोक संपर्कात आले आहेत. त्या सर्वांचा शोध घेऊन सर्व 12 लोक बीड जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वार्ड मध्ये दाखल केले आहेत.
आज त्यांचा स्वब घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात हे याचा आढावा घेत आहेत. चेक पोस्ट वर बंदोबस्त असतानाही हुलकावणी देत त्यांनी तेथून पळ काढत परभणी गाठल्याची माहिती विश्वनिय सूत्रांनी दिली.