CoronaVirus :..तर आजच होणार बीड जिल्हा कोरोनामुक्त ? बीडकर करत आहेत प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 01:15 PM2020-04-23T13:15:54+5:302020-04-23T13:20:12+5:30
अहमदनगर जिल्ह्यात जमातमध्ये गेलेल्या पिंपळा येथील एका ६३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती.
बीड : आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील कोरोनाग्रस्ताचा पहिला रिपोर्ट कोरोना पॉॅिझटिव्ह आला. त्यानंतर १४ दिवसांनी दुसरा स्वॅब घेतला असता तो निगेटिव्ह आला आहे. आता आज सायंकाळपर्यंत आणखी एक अहवाल येणार आहे. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास बीड जिल्हा कोरोनामुक्त होणार आहे. या रिपोर्टकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात जमातमध्ये गेलेल्या पिंपळा येथील एका ६३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. याचा अहवाल ८ एप्रिल रोजी आला होता. त्यानंतर आता नियमाप्रमाणे १४ दिवसांनी त्याचा दुसरा स्वॅब घेण्यात आला. याचा अहवाल बुधवारी रात्री आला. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दुसरा स्वॅब २४ तासांनी घेतला जातो. त्याप्रमाणे बुधवारी रात्रीच दुसरा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल गुरूवारी सायंकाळी येण्याची शक्यता आहे. तो देखील निगेटिव्ह यावा, अशी प्रार्थना बीडकर करीत आहेत. हा अहवाल जर निगेटिव्ह आला तर बीड जिल्हा कोरोनामुक्त होणार आहे. या निकालाकडे सर्व बीडकरांचे लक्ष लागले आहे.