CoronaVirus : धारूरात संचारबंदी शिथील काळात गर्दी वाढली; सोशल डिस्टनसिंगचा बोजबारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:13 PM2020-04-08T17:13:32+5:302020-04-08T17:15:55+5:30
जिल्ह्यात ऑड - इव्हन सूत्राप्रमाणे संचारबंदी शिथिल होते
धारूर : शहरात संचारबंदी शिथीलतेच्या काळात रस्त्यावर जञे सारखी गर्दी दिसत आहे. बँकासमोर तर खातेदाराच्या अर्धा किंमी रांगा लागल्या होत्या यामुळे सोशल डिस्टनसिंगचा बोजबारा उडाला आहे. नागरिकांची गर्दी वाढत असल्याने पोलीस, नगरपालीका प्रशासनावर मात्र हतबल होण्याची वेळ आली आहे.
धारूर शहरातील संचारबंदी तब्बल पंचेचाळीस तासा नंतर तिन तासा साठी बुधवारी शिथील करण्यात आली. मात्र शिथिल होण्यापूर्वीच साडेदहा वाजल्या पासून नागरीक रस्त्यावर येण्यास सुरूवात झाली होती. शहरातील बँक आता 14 तारखेपर्यंत बंद राहणार असल्याने इंडीया बँकेच्या मुख्यरस्त्यावरील व तेलगाव रोड वरील दोन्ही ठिकणी अर्धा किमीच्या रांगा लागल्या होत्या. महाईसेवा केंद्रावर, गँस एजन्सी समोर गर्दी होती. सोशलडिस्टशीन चा माञ सर्वच ठिकाणी बोजबाजा उडाला होता. मुख्यबाजारपेठेत हि गर्दी वाढली होती प्रशासनने दिलेल्या दक्षतेच्या कुठल्याच सुचनाचे पालन केले जात नव्हते.
पंचेचाळीस तासाच्या शिथीलते नंतर माञ प्रशासकीय यंञणेची नियोजन करताना तांराबळ उडाल्याचे दिसत होते.पोलीसांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला काही दुचाकींवर कारवाई केली. बँका व महाईसेवा यांनी सोशल डिस्टनसिंग पाळण्यासाठी नियोजन करावे, नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी केले.