coronavirus : पतीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या धक्क्याने पत्नीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 05:37 PM2020-08-25T17:37:53+5:302020-08-25T17:49:50+5:30
पतीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पत्नी दु:खात आणि भीतीच्या छायेखाली
धारूर : पती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याच्या धक्क्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सोमवारी (दि.२४) रात्री आरोग्य विभागाने त्यास उपचारासाठी नेले. याचा धक्का घेत भीतीपोटी पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धारुर तालुक्यातील गावंदरा येथे समोर आली आहे.
धारूर तालुक्यातील गावंदरा येथील कुसाबाई बडे (वय ५८) यांच्या पतीचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पती कोरोनाग्रस्त आढळल्याचा धक्का कुसाबाई बडे यांना बसला. त्यानंतर त्या दु:खात आणि भीतीच्या छायेखाली होत्या. मंगळवारी (दि. २५) घरातील लोकांनी त्यांना झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला, पण त्या मृत अवस्थेत आढळल्या.
येथील १२ साधक कोरोनाबाधित झाले आहेत #coronavirushttps://t.co/sB2mtMquUY
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 25, 2020
पतीला कोरोना झाल्याच्या धक्क्यातून आणि भीतीने त्यांचा मृत्यू झाल्याची शंका कुटुंबिय व शेजारील लोक व्यक्त करीत आहेत. बडे यांच्या कुटुंबियांचे स्वॅब घेण्यात आले असून सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. तसेच कुसाबाई बडे यांचा ही स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे.
रुग्णाच्या किडनीच्या आजारासाठी ठेवली होती रक्कम #coronavirushttps://t.co/j5ZHSS11uV
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 25, 2020