कोरोनायोद्धेच वेतनाविना; वैतागलेल्या स्वछता कर्मचाऱ्याचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 05:03 PM2021-04-07T17:03:28+5:302021-04-07T17:04:43+5:30

Coronayoddha Attempted suicide अंबाजोगाई नगर परिषदेतील स्वछता विभागात ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत असलेला कर्मचारी विनोद बळीराम सरवदे  यांनी बुधवारी दुपारी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Coronayoddhe without pay; Attempted self-immolation by pouring petrol on the body of an annoyed cleaning worker | कोरोनायोद्धेच वेतनाविना; वैतागलेल्या स्वछता कर्मचाऱ्याचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

कोरोनायोद्धेच वेतनाविना; वैतागलेल्या स्वछता कर्मचाऱ्याचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देमुख्याधिकारी यांच्या दालनासमोरील प्रकार 

अंबाजोगाई-:तीन  महिन्या पासुन वेतन रखडल्याने वैतागलेल्या स्वछता कर्मचाऱ्याने बुधवारी दुपारी अंगावर पेट्रोल ओतुन आत्मदहनाचा प्रयत्न केला.हा प्रकार मुख्याधिकारी यांच्या दालना समोर घडला.वेतना विना कोव्हीड योद्धेच संकटात सापडले आहेत.

अंबाजोगाई नगर परिषदेतील स्वछता विभागात ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत असलेला कर्मचारी विनोद बळीराम सरवदे  यांनी बुधवारी दुपारी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन काडी ओढत असताना उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले.त्यामुळे पुढील अनर्थ टळला.सरवदे हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वछता विभागात कार्यरत आहेत.गेल्या तीन महिन्यां पासून त्यांचा पगार न झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत.रखडलेले वेतन मिळावे यासाठी त्यांनी नगर परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही समस्या मार्गी लागत नसल्याने त्यांनी आत्मदहनाचे पाऊल उचलले.

कोरोनाच्या काळात स्वछतेचे काम करणारे कोरोना योद्धेच वेतनाविना काम करत आहेत. हि दुर्देवी वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. या संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की मी कोरोनाच्या बेठकीसाठी गेलो होतो. त्या वेळी हा प्रसंग घडला.या बाबत सविस्तर माहिती घेऊन हा प्रश्न निकाली काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Coronayoddhe without pay; Attempted self-immolation by pouring petrol on the body of an annoyed cleaning worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.