महामार्गावर वेग वाढल्याची किंमत ९३ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:40 AM2021-09-08T04:40:31+5:302021-09-08T04:40:31+5:30
बीड : जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाचे नूतनीकरण झाल्यापासून वाहनांची ओव्हरस्पीड ही एक समस्या बनत आहे. या गतीला आवर घालण्यासाठी ...
बीड : जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाचे नूतनीकरण झाल्यापासून वाहनांची ओव्हरस्पीड ही एक समस्या बनत आहे. या गतीला आवर घालण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. जानेवारीपासून ऑगस्ट अखेरपर्यंत जवळपास ९२ लाख ५२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
धुळे-सोलापूर, कल्याण-विशाखापटणम, पाटोदा-केज, पालखी मार्ग यांसह इतर महामार्गांचे नूतनीकरण झाल्यापासून वाहनचालकांची गैरसोय कमी झाली आहे. मात्र, काही जण सुसाट वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपघात होऊन जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महामार्गावर विविध ठिकाणी स्पीडगन वाहनांद्वारे ओव्हरस्पीड असलेल्या वाहनांवर लक्ष ठेवले जाते. तसेच वेगमर्यादा जास्त असेल तर त्या वाहन मालकाला ऑनलाईन दंड आकारला जात आहे. त्यामुळे वेगमर्यादा जास्त असेल तर, दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे महामार्गावर वाहन चालकांनी वेगमर्यादेचे पालन करण्याचे आवाहन महामार्ग पोलीस प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी केले आहे. अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जनजागृती केली जात असल्याचे देखील बांगर यांनी सांगितले.
...
महामार्गावर कोणत्या महिन्यात किती दंड
जानेवारी १२००
फेब्रुवारी १८००
मार्च १०००
एप्रिल १३००
मे १०००
जून १०००
जुलै १०००
ऑगस्ट १२२८
...
धावत्या गाडीचा मोजला जातो वेग
महामार्गावर एखाद्या ठिकाणी ओव्हरस्पीडगन व्हॅन उभा केली जाते. त्याठिकाणी कर्मचारी बसून वेगमर्यादा ओलांडलेली असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. जवळपास दररोज १०० वाहनांवर कारवाई केली जाते.
...
एसएमएसवर मिळते पावती
महामार्गावरील वाहनावर दंडात्मक कारवाई केल्यानंतर दंडाच्या रकमेचा एसएमएस संबंधित वाहन मालकाच्या मोबाईल नंबरवर पाठवली जाते. त्यावरून ऑनलाईन दंड भरण्याची देखील सुविधा दिलेली असते.