कापूस क्षेत्र एक लाख हेक्टरने घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:38 AM2021-08-24T04:38:19+5:302021-08-24T04:38:19+5:30

प्रभात बुडूख / लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या कापसाचे क्षेत्र यावर्षी मागील काही वर्षाच्या ...

Cotton area decreased by one lakh hectares | कापूस क्षेत्र एक लाख हेक्टरने घटले

कापूस क्षेत्र एक लाख हेक्टरने घटले

Next

प्रभात बुडूख /

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या कापसाचे क्षेत्र यावर्षी मागील काही वर्षाच्या तुलनेत कमालीचे घटले आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ६ हजार २२६ हेक्टर क्षेत्र घटले आहे. याचा मोठा परिणाम जिल्ह्यातील जिनिंग व्यवसायावर होणार आहे. पुढील काळात हा उद्योग टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

कापूस लागवडीमुळे दुष्काळी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून क्षेत्र जास्त होते; मात्र मागील काही वर्षात सोयाबीनचा पेरा वाढला असून, सोयाबीननंतर आणखी एक पीक घेता येते. त्यासाठी शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल वाढला आहे. कापूस लागवडीचे क्षेत्र घटण्यासाठी अनेक कारणे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कापूस लागवडीचा सरासरी खर्च लक्षात घेता सोयाबीन पेरणीसाठी खर्च कमी करावा लागतो. कापूस वेचणीचा दर प्रति किलो १० ते १५ रुपये इतका झाला असून, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दराच्या तुलनेत तो जास्त आहे. शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची होणारी हेळसांड वेळेवर न मिळणारे कापसाचे पैसे यामुळे कापूस क्षेत्रात लक्षणीय घट झाली असून, याचा दुरगामी परिणाम जिनिंग व्यवसायावर होणार आहे.

जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र सर्वांधिक असल्यामुळे जवळपास ९२ ते १०० जिनिंग आहेत. कापूस क्षेत्र दरवर्षी घटत असल्याने जिनिंग व्यवसायावर याचा परिणाम होणार आहे.

...

बोंडअळी नष्ट करण्यात अपयश

मागील चार वर्षांपासून कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. याचा परिणाम उत्पादनावर होत होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. दरम्यान, बोंडअळी समूळ नष्ट करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळेदेखील क्षेत्र घटल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी व्यक्त केले.

...

खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांची पिळवणूक

शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना प्रतवारी करून योग्य भाव दिला जात नाही. त्याठिकाणी असलेल्या ग्रेडरकडून अनेक वेळा लाचेची मागणी केल्याचेदेखील समोर आले आहे. त्यामुळे कापूस लागवड न करण्याचा निर्णय घेतल्याचे शेतकरी सतीश जगताप यांनी सांगितले.

...

बीड जिल्ह्यातील घटत असलेले कापूस क्षेत्र व वाढलेले प्रोसेसिंग युनिट (जिनिंग) याचा ताळमेळ या वर्षात बसणार नाही. त्यामुळे जिनिंग उद्योगावर परिणाम होणार आहे. पुढील काळात या व्यवसायाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

-बी.बी. जाधव, जिनिंग व्यावसायिक.

....

जिनिंगची संख्या...

गेवराई २५

बीड १३

माजलगाव २२

वडवणी ६

परळी ४

अंबाजोगाई ४

पाटोदा २

केज ३

आष्टी ३

शिरूर कासार २

धारुर ८

230821\23_2_bed_19_23082021_14.jpg~230821\23_2_bed_18_23082021_14.jpg

कापूस २~कापूस

Web Title: Cotton area decreased by one lakh hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.