कापूस सांधणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:22 AM2021-06-19T04:22:54+5:302021-06-19T04:22:54+5:30
... थांबलेली शेतीकामे पुन्हा सुरू शिरूर कासार : पाऊस थांबला. वारे सुटल्याने शेतात ओल न राहिल्याचे लक्षात ...
...
थांबलेली शेतीकामे पुन्हा सुरू
शिरूर कासार : पाऊस थांबला. वारे सुटल्याने शेतात ओल न राहिल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी कापूस लागवड व पेरणीचे काम थांबवले होते. मात्र, पुन्हा पाऊस आल्याने थांबलेली पेरणी, लावणी शुक्रवारी सुरुवात केली. शेतशिवार पुन्हा माणसांनी फुलून गेले आहे.
...
रस्ते खड्ड्यांनी व्यापले
शिरूर कासार : तालुक्यात येणारे सर्वच रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे त्रासाचे ठरत आहेत. चारी बाजूंनी येणाऱ्या सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याने वाहन चालकासह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
...
रोज केली जातेय कोरोना टेस्टिंग
शिरूर कासार: कोरोनाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी टेस्टिंगवर भर दिला जात आहे. पोलिसांची मदत घेत रोडवर मोटारसायकल, पादचाऱ्यांना अडवून त्यांची टेस्टिंग केली जात आहे. शिवाय, मास्क नसलेल्यांची टेस्टिंग होत असल्याने मास्कचा वापर आवर्जून केला जात असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. पोलीस स्टेशनसमोरही टेस्टिंग रोज केली जात आहे.
...
जिल्हा सहकारी बँकेत अनुदान वाटप
शिरूर कासार : शासनाने मागील वर्षी जाहीर केलेल्या अनुदानाचे अद्यापही जिल्हा सहकारी बँकेत वाटप केले जात आहे. गावनिहाय वाटप सुरू आहे. ज्या गावांचा नंबर आला त्या गावातील लोक अनुदान उचलण्यासाठी बँकेत गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.