देश व्यापाऱ्यांवर नव्हे, बळीराजाच्या नांगरावर चालतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:36 AM2021-08-27T04:36:20+5:302021-08-27T04:36:20+5:30

माजलगाव : निसर्गाच्या संकेताकडे दुर्लक्ष करून इकडे तिकडे पाहत बसतो, ही आपली चूक आहे. शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज ...

The country runs on the plow of Baliraja, not on traders | देश व्यापाऱ्यांवर नव्हे, बळीराजाच्या नांगरावर चालतो

देश व्यापाऱ्यांवर नव्हे, बळीराजाच्या नांगरावर चालतो

Next

माजलगाव : निसर्गाच्या संकेताकडे दुर्लक्ष करून इकडे तिकडे पाहत बसतो, ही आपली चूक आहे. शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज देण्यात अजूनही बऱ्याच अंशी व्यापाऱ्यांचा, कंपन्यांचा फायदा पाहिला जातो, ही दुर्दैवी बाब आहे. देश व्यापाऱ्यांवर चालत नसून बळीराजाच्या नांगरावर चालतो, असे प्रतिपादन शेतकरी पुत्र तथा हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले.

तालुक्यातील सादोळा येथे बुधवारी डख यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर सादोळ्याच्या सरपंच कमलताई सोळंके, उपसरपंच राधा शिंदे, शीतल डख, सलोनी डक, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत शेजुळ, पुरुषोत्तम जाधव, प्रसिद्ध व्याख्याते प्रदीपराव सोळंके, चेअरमन विष्णुपंत सोळंके आदींची उपस्थिती होती.

या वेळी पंजाबराव डख म्हणाले की, पृथ्वीच्या काळजीची बळीराजाची निर्मिती देवाने केली. देश हा व्यापाऱ्यांवर चालत नसून बळीराजाच्या नांगरावर चालतो. अख्ख्या लॉकडाऊनमध्ये सगळ्या कंपन्या बंद पडल्या, पण बळीराजाची कंपनी चालू होती. निसर्गाच्या संकेताकडे दुर्लक्ष करून आपण इकडे तिकडे पाहत बसतो ही आपली चूक असल्याचे सांगत अनेक उदाहरणांच्या माध्यमातून डख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

पंजाबराव डख सादोळ्यात आल्यानंतर गावातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन दिलीप सोळंके यांनी केले. प्रदीप सोळंके यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पांडुरंग सोळुंके, धीरज सोळुंके, अंकुशराव शिंदे, गजानन शिंदे, डॉ. अरुण सोळुंके, विक्रम सोळुंके, गौतम सोळुंके, नामदेव सादोळकर, सोन्याबापू सोळुंके, प्रदीप सोळुंके, संजय सोळुंके, राजू एरंडे, बबन सोळुंके, दिलीप सोळुंके राजाभाऊ सोळुंके आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

दोन लाख शेतकऱ्यांना मदत

सोशल मीडियाचा वापर करून दोन लाख शेतकऱ्यांच्या मदतीची कल्पना आली. आपल्या अभ्यासाचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा यासाठी सोशल मीडियाचा खूप मोठा फायदा झाला. मान्सूनची वाटचाल ही पंढरपूरच्या वारीसारखी असून अंदमानातून सुरू झालेली ही मान्सूनची वारी ही हवेचा वेग व दिशेनुसार चालते.

माझी प्रयोगशाळा सकारात्मक

अनेक हवामान शास्त्रज्ञ मला माझ्या हवामानाच्या अचूक अंदाजाच्या पाठीमागील प्रयोगशाळेविषयी विचारतात. ते व्यावसायिक आहेत. पण मी नाही, मी त्यांना तुमच्याकडे सॅटेलाइट व मोठी यंत्रणा आहे, पण ती नकारात्मक आहे. माझ्याकडची प्रयोगशाळा सकारात्मक व निसर्ग संकेतांची असल्यामुळे मी ती तुमच्याशी शेअर करू शकत नसल्याचे उत्तर देतो, असे पंजाबराव डख या वेळी म्हणाले.

260821\purusttam karva_img-20210824-wa0027_14.jpg

Web Title: The country runs on the plow of Baliraja, not on traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.