सावरगावातील दसरा मेळाव्याकडे देशाचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:14 AM2019-10-08T00:14:07+5:302019-10-08T00:20:20+5:30

बीड : पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे ८ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , ...

Country's attention to Dussera fair in Savargaon | सावरगावातील दसरा मेळाव्याकडे देशाचे लक्ष

सावरगावातील दसरा मेळाव्याकडे देशाचे लक्ष

Next
ठळक मुद्देअमित शहा, देवेंद्र फडणवीस येणार : भगव्या पताकांनी सजणार संत भगवानबाबांचे जन्मस्थळ

बीड : पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे ८ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दिग्ग्ज नेते उपस्थित राहणार असून या मेळाव्याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अखंडपणे सुरु ठेवली आहे. भगवानगडावर दसरा मेळावा होत होता. गत दोन वर्षांपासून संत भगवानबाबांच्या जन्मभूमीत सावरगाव घाट येथे भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा सुरु केला. या मेळाव्यासाठी महाराष्टÑासह विविध राज्यातून लोखोंच्या संख्येने भक्तगण येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त नियुक्त केला आहे. पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी आयबी, सीआयडी, सीआरएफ या सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
रामगडावरही मेळावा
बीड तालुक्यातील श्री क्षेत्र रामगड येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. तत्पूर्वी सकाळी साडेदहा वाजता नामलगाव फाटा ते श्री क्षेत्र रामगडापर्यंत दुचाकी रॅली निघणार आहे. पंचक्रोशीतील भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मठाधिपती लक्ष्मण महाराज यांनी केले आहे.
बारा एकर जागेत मेळावा
मेळाव्यासाठी भगवान भक्तीगडाच्या बारा एकर मोकळ्या जागेवर दोन व्यासपीठ उभारले आहेत.
एका व्यासपीठावर केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्यासह प्रमुख असतील.
दुसºया व्यासपीठावर पक्षाचे आजी- माजी आमदार, राज्यातून येणारे पक्षाचे उमेदवार आदी उपस्थित राहणार आहेत.
३७० तोफांची सलामी
सावरगावातील भगवान भक्तीगडावर मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक येणार असल्याने या ठिकाणी गर्दीचा उच्चांक मोडला जाणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजकांनी गृहमंत्री अमित शहा यांनी ३७० कलम रद्द केल्यामुळे ३७० तोफांची सलामी आणि ३७० तिरंग्या झेंड्यांनी स्वागत केले जाणार आहे. तर सभास्थळी एक लाखापर्यंत भगवे झेंडे लावण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Web Title: Country's attention to Dussera fair in Savargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.