मोहा येथे ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:24 AM2021-05-28T04:24:45+5:302021-05-28T04:24:45+5:30
परळी : कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाई, मानवलोक,आरोग्य विभाग बीड व महाराष्ट्र शिक्षण संस्था,मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र ...
परळी : कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाई, मानवलोक,आरोग्य विभाग बीड व महाराष्ट्र शिक्षण संस्था,मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र विद्यालयात कोरोनाच्या सौम्य रुग्णांसाठी व विलगीकरण कक्ष उपलब्ध असणारे सुसज्ज असे ५० बेडचे कोविड केअर सेंटर २४ मे पासून सुरू झाले.
यावेळी मानवलोकचे कार्यवाहक अनिकेत लोहिया,परळी तालुक्याचे तहसीलदार सुरेश शेजुळ,नायब तहसीलदार बाबूराव रुपनर ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे ,प्रतिष्ठानचे सचिव ॲड. अजय बुरांडे,सिरसाला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एकसिंगे,मोहा गावचे सरपंच पांडुरंग शेप,यांच्यासह मानवलोकचे व प्राथमिक आरोग्य केंद्र मोहाचे वैद्यकीय अधिकारी,आजी-माजी पंचायत समिती सदस्य,गाव परिसरातील प्रतिष्ठित नागरिक,महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण भागात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी हे कोविड केअर सेंटर निश्चित फायदेशीर ठरणार आहे. कोरोनाच्या काळात विलगीकरण,मास्क,सॅनिटायझरचा वापर व स्वच्छता अतिशय महत्त्वाची असून सर्वांनी याबाबी लक्षात घ्याव्यात तसेच संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मानवलोक आवश्यक तयारी करून असल्याचे मानवलोकचे कार्यवाहक अनिकेत लोहिया यांनी सांगितले. प्रास्ताविक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठानचे सचिव ॲड. अजय बुरांडे यांनी केले. सूत्रसंचालन विनायक राजमाने यांनी केले. विशाल देशमुख यांनी आभार मानले.