ऑक्सिजनविना चालते कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:36 AM2021-05-08T04:36:16+5:302021-05-08T04:36:16+5:30
वडवणी : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन तीन कोविड केअर सेंटर सुरू आहेत. तीनशेहून जास्त ...
वडवणी : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन तीन कोविड केअर सेंटर सुरू आहेत. तीनशेहून जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजन बेड नसल्यामुळे गंभीर रुग्णांची गैरसोय होत असल्याने याची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील रुग्णांसाठी किमान ५० ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्याची मागणी कोविडबाधित रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.
शहरात कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयातील इमारतीमध्ये शंभर बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून खासगी दोन ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू आहेत. एकाही सेंटरमध्ये एकही ऑक्सिजन बेड नसल्यामुळे गंभीर रुग्णांची गैरसोय होत असून थेट बीडला जावे लागत आहे. यामुळे रुग्णांची प्रकृती अचानक खालावली जात आहे यामुळे ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.