लोकसहभागातून कोविड केअर सेंटर उभारावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:34 AM2021-05-13T04:34:17+5:302021-05-13T04:34:17+5:30
या सेंटरमध्ये १०० बेडची मोफत व्यवस्था केली असून, सर्व भौतिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यावेळी डॉ. पवार म्हणाले, ...
या सेंटरमध्ये १०० बेडची मोफत व्यवस्था केली असून, सर्व भौतिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यावेळी डॉ. पवार म्हणाले, गरीब व गरजू व्यक्तींना प्राथमिक उपचार मिळणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे वाढणारा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आजपर्यंत मानवलोकने ६ सेंटर लोकसहभागातून निर्माण केले असून, जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देण्याचा मानस अनिकेत लोहिया यांनी व्यक्त केला. यावेळी कुसळंब येथील सेंटरसाठी ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर मशीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली व माजलगावसाठी दोन मशीन उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले. यावेळी पोस्ट कोविड रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रत्येक सेंटरमध्ये किमान दहा बेडची सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ. राजेभोसले यांनी केले.
यावेळी कोरोनाबाधित महिला रुग्णांचे मानसिक आरोग्य सुधारणे आवश्यक असून, स्वतंत्र महिला कोविड केअर सेंटरमध्ये अशा रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न सामाजिक संस्था व शासनाने करावा. त्यासाठी समाजातील सक्षम घटकांनी मदत करण्याचे आवाहन शिवाजी रांजवण यांनी केले.
सरस्वती पब्लिक स्कूलने मोफत जागा उपलब्ध केल्याचे सांगून, दानशूर व्यक्तींनी या केंद्रामधील अन्न छत्रासाठी मदत करण्याचे आवाहन सरस्वती सेवाभावी संस्थेचे प्रल्हाद कुटे यांनी केले.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे, अरुण राऊत, ओमकार खुरपे, पांडुरंग चांडक, अण्णासाहेब तौर, पोलीस निरीक्षक इधाटे, सदाशिव फपाळ, गुरुदेव फपाळ, डॉ गडेकर, प्रा. मिटकरी, श्रीकृष्ण कुटे, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. रमेश कुटे यांनी आभार मानले.