कोविड सेंटरची बिले रखडली, चालकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:36 AM2021-09-18T04:36:33+5:302021-09-18T04:36:33+5:30

गत दोन वर्षांपासून पदर खर्चाने आतापर्यंत कोरोना केंद्र चालविली आहेत. किराणा, भाजीपाला, फळे, आणि इतर मांसाहारी आहाराची देयके मोठ्या ...

Covid Center bills stagnant, starvation time on drivers | कोविड सेंटरची बिले रखडली, चालकांवर उपासमारीची वेळ

कोविड सेंटरची बिले रखडली, चालकांवर उपासमारीची वेळ

Next

गत दोन वर्षांपासून पदर खर्चाने आतापर्यंत कोरोना केंद्र चालविली आहेत. किराणा, भाजीपाला, फळे, आणि इतर मांसाहारी आहाराची देयके मोठ्या प्रमाणावर झाली असून संबंधित दुकानदारांना देयके देण्यासाठी व्याजाने पैसे काढण्याची वेळ आली आहे. शासनाने आतापर्यंत एक छदामही दिला नसल्यामुळे कोरोना केंद्रचालकांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे

कोरोना काळापासून आतापर्यंत आम्ही स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा केली आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकस आहार पुरविण्याची जबाबदारी आम्ही पार पाडली. आमच्या कुटुंबातील सदस्यांसारखीच आम्ही कोरोनाबाधित रुग्णांची काळजी घेतली असून, शासन मात्र आमची वेळेत देयके अदा करत नाही. त्यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अशी प्रतिक्रिया केंद्रचालक सुरेश खारोडे यांनी व्यक्त केली.

Web Title: Covid Center bills stagnant, starvation time on drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.