आपेगाव येथे कोविड सेंटर कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:34 AM2021-05-18T04:34:20+5:302021-05-18T04:34:20+5:30
अंबाजोगाई : तालुक्यातील आपेगाव येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, बीड इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडिया) संस्था, अंबाजोगाई यांच्या ...
अंबाजोगाई :
तालुक्यातील आपेगाव येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, बीड इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडिया) संस्था, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मानवलोक संस्था, अंबाजोगाई, ग्रामपंचायत आपेगाव आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या मदतीने श्री जयकिसान महाविद्यालय, आपेगाव या ठिकाणी कोविड सेंटर कार्यान्वित झाले.
जि.प. सदस्य राजेसाहेब देशमुख यांच्या पुढाकार व संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या कोविड केअर सेंटरचे आमदार संजयभाऊ दौंड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर येथे मोफत उपचार सुरू झाले आहेत.
याप्रसंगी आ. संजय दौंड म्हणाले की, जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख हे एक संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी स्वतः ला झोकून देत काम करीत आहेत. देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारलेले आपेगाव येथील सर्व सुविधांनी युक्त कोविड केअर सेंटर म्हणजे माणुसकीचे उत्तम उदाहरण असून, सर्वांनी त्याचा आदर्श घ्यावा, असे मत आ.संजय दौंड यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी राजेसाहेब देशमुख म्हणाले की, अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची दररोज वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन गरजू रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्यांची उपचारासाठी होणारी परवड थांबावी, या उद्देशाने हे कोविड केंद्र उभारले आहे.
या भागातील लोकप्रतिनिधी व इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडिया) संस्था,अंबाजोगाई या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी तसेच बीड जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, आपेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियंका नीलेश शिंदे आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव जयजीत शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला. पहिल्या टप्प्यातील ५० खाटा असलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन झाले आहे. यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी आपेगाव येथील कोविड केअर सेंटरमधील उपलब्ध सुविधांची पाहणी करून माहिती घेतली, तसेच येथे आवश्यक असलेल्या डॉक्टर्स व अन्य स्टाफ उपलब्ध करून, रुग्णांना भोजन, नाष्टा आदी व्यवस्थापन करण्याबाबतचे नियोजन पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी माजी आ.पृथ्विराज साठे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सिरसाट, जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख, डॉ.नरेंद्र काळे, विलास सोनवणे, अनिकेत लोहिया, गोविंद देशमुख, राहुल सोनवणे, हाणमंत मोरे, ॲड.माधव जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार, लालासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे,
आबासाहेब पांडे, सामाजिक कार्यकर्ते नीलेश शिंदे, जयजीत शिंदे, संतोष सोनवणे, आश्रुबा करडे, केशव ढगे, शंभूराजे देशमुख, ईश्वर शिंदे, अशोक देशमुख, शरद शिंदे, गणेश गंगणे उपस्थित होते.
===Photopath===
170521\img-20210514-wa0127_14.jpg