कोविड सेंटरमध्ये रूग्णांनी घेतला शिरखुर्मा, गुलगुल्याचा स्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:33 AM2021-05-23T04:33:22+5:302021-05-23T04:33:22+5:30

शिरूर कासार : जिल्ह्यात कोरोना रुग्णाची वाढती संख्या आणि मृत्यू यामुळे सर्वसामान्य जनता धास्तावून गेलेली आहे व ...

At the Covid Center, patients tasted shirkhurma, gulagulya | कोविड सेंटरमध्ये रूग्णांनी घेतला शिरखुर्मा, गुलगुल्याचा स्वाद

कोविड सेंटरमध्ये रूग्णांनी घेतला शिरखुर्मा, गुलगुल्याचा स्वाद

Next

शिरूर कासार : जिल्ह्यात कोरोना रुग्णाची वाढती संख्या आणि मृत्यू यामुळे सर्वसामान्य जनता धास्तावून गेलेली आहे व अनेक ठिकाणी कोविड रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असताना शिरूर कासार येथील सामाजिक कार्यकर्ते तथा टिपू सुलतान युवा मंचचे समीर बागवान यांनी त्यांची ईद ही सर्व नियमावलीचे पालन करून शिरूरच्या शासकीय कोविड केअर सेंटरवर साजरी केली.

सामाजिक कार्यकर्ते समीर बागवान यांनी बाल संरक्षण समितीचे सदस्य समीर पठाण यांच्याशी संपर्क करून कोविड सेंटरवर ईद साजरी करण्याची इच्छा बोलून दाखवली त्या नंतर लगेच त्यांनी व्यवस्थापक डॉ. राठोड व इतरांशी बोलून परवानगी घेतली. २२ मे रोजी नियमांचे पालन करत कोविड सेंटरवरील सर्व रुग्णांना शिरखुर्मा, गुलगुल्यांचा आस्वाद दिला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी माही शेख,जावेद बागवान, महेश औसरमल,सुरेश खारोडे,माऊली पानसंबळ यांनी परिश्रम घेतले. तर कोविड सेंटर वरील वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली मिसाळ,व्यवस्थापक डॉ.राठोड, जरांगे,वार्डबॉय गुंड,गाडे,पवार,राऊत,कापसे यांच्यासह सर्व सिस्टर व कर्मचारी यांनी सहकार्य केले

===Photopath===

220521\vijaykumar gadekar_img-20210522-wa0037_14.jpg

Web Title: At the Covid Center, patients tasted shirkhurma, gulagulya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.