केज मतदारसंघात नवीन १६ साठवण तलावांची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:39 AM2021-09-14T04:39:07+5:302021-09-14T04:39:07+5:30

अंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघातील उपलब्ध १६ नैसर्गिक साइटवर साठवण तलावांची निर्मिती करण्याची मागणी आ. नमिता मुंदडा यांनी ...

Create 16 new storage ponds in Cage constituency | केज मतदारसंघात नवीन १६ साठवण तलावांची निर्मिती करा

केज मतदारसंघात नवीन १६ साठवण तलावांची निर्मिती करा

Next

अंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघातील उपलब्ध १६ नैसर्गिक साइटवर साठवण तलावांची निर्मिती करण्याची मागणी आ. नमिता मुंदडा यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाची ओळख महाराष्ट्राला ऊसतोडणी मजूर पुरवणारा मतदारसंघ अशी आहे. यांचे प्रमुख कारण या विभागातील कोरडवाहू शेती हे आहे. या मतदारसंघात साठवण तलावांची निर्मिती व्हावी, अशा अनेक नैसर्गिक साइडस उपलब्ध आहेत. शिवाय या मतदारसंघातील नागरिकांचीही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या साठवण तलावांच्या निर्मितीमुळे प्रतिवर्षी ऊस तोडणीसाठी जाणारा मजूर शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाल्यामुळे आपल्या शेतात काम करतील व त्यांचे जीवनमान स्थिरावण्यास मदत होईल. याकरिता केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील उपलब्ध असलेल्या या नैसर्गिक साइड्सवर मांजरा खो-यातील अनेक उपनद्यांचे कोट्यवधी लिटर पाणी प्रतिवर्षी वाहून जात असते. तेव्हा या पाण्याची अडवणूक करुन तलावनिर्मिती केल्यास या मतदारसंघातील ऊसतोड मजुरांचे सातत्याने होणारे स्थलांतर रोखता येईल, असे या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित कार्यालयास सर्वेक्षणाचे आदेश साठवण तलावांना मंजुरी देण्याची मागणी आ. मुंदडा यांनी केली आहे.

या तलावांच्या निर्मितीसाठी सर्वेक्षण व्हावे

अंबाजोगाई तालुक्यातील उपलब्ध नैसर्गिक साइडवर बुट्टेनाथ साठवण तलाव, कुरणवाडी साठवण तलाव, धावडी साठवण तलाव, वरवटी साठवण तलाव, साकुड साठवण तलाव, राक्षसवाडी साठवण तलाव, मांडवा तांडा साठवण तलाव, चिचखंडी साठवण तलाव, ममदापूर (परळी) साठवण तलाव, येल्डा साठवण तलाव आणि केज तालुक्यातील कोरड्याचीवाडी साठवण तलाव, घाटेवाडी साठवण तलाव, कचारवाडी साठवण तलाव, बेंगाळवाडी साठवण तलाव, बुरंडवाडी साठवण तलाव, देवगाव साठवण तलाव, कोल्हेवाडी तलावासाठी सर्वेक्षण व मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Create 16 new storage ponds in Cage constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.