तहसिलदारांचा आदेश डावलणाऱ्या ग्रामसेवकांसह लिपीकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 19:15 IST2021-09-06T19:14:34+5:302021-09-06T19:15:10+5:30
तलवाडा परिसरात अतिवृष्टी झाल्याने तलवाडा येथील पाझर तलाव फुटण्याची शक्यता होती.

तहसिलदारांचा आदेश डावलणाऱ्या ग्रामसेवकांसह लिपीकावर गुन्हा
गेवराई : नैसर्गिक आपत्ती काळात तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचा आदेश डावलल्या प्रकरणी तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकासह लिपिकाविरुद्ध नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजयकुमार मस्के हे ग्रामसेवक तर तुळशिराम वाघमारे हे लिपीक म्हणून तलवाडा ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत आहे. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तलवाडा परिसरात अतिवृष्टी झाल्याने तलवाडा येथील पाझर तलाव फुटण्याची शक्यता होती. त्यामुळे ग्रामसेवक मस्के, लिपिक वाघमारे यांना मुख्यालयी थांबण्याचे निर्देश तहसीलदार सचिन खाडे यांनी दिले होते. परंतू स्वतः खाडे व तलाठी सुभाष वाकोडे, मोलकुरुलकर, कोतवाल गजानन शिंगने हे ५ वाजता तलावास भेट देण्यासाठी गेले असता ग्रामसेवक मस्के व लिपिक वाघमारे हे परस्पर निघून गेले. त्यांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचा आदेश डावलला म्हणून तलवाड्याचे तलाठी सुभाष वाकोडे यांनी तलवाडा पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून ग्रामसेवकासह लिपिकाविरुद्ध नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.