इच्छेविरोधात विवाह केल्यामुळे आई-वडिलांसह पती, सासू, सासऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:34 AM2021-03-31T04:34:43+5:302021-03-31T04:34:43+5:30
वडवणी : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर इच्छेविरोधात संमतीशिवाय वारंवार शारीरिक संबंध ठेवून गरोदर केले म्हणून ७ मार्च रोजी पीडित ...
वडवणी : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर इच्छेविरोधात संमतीशिवाय वारंवार शारीरिक संबंध ठेवून गरोदर केले म्हणून ७ मार्च रोजी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आई-वडील, सासू-सासरे व पतीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी पतीला अटक केली असून, तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.
शहरातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे एका मुलाबरोबर लग्न झाले होते. विशेष म्हणजे अल्पवयीन असल्याचे आई व वडील यांना माहिती असूनदेखील लग्न लावले होेते. पतीला देखील मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती होती. दरम्यान लग्नानंतर पतीने अल्पवयीन मुलीवर इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवल्याने ती गरोदर राहिली. मुलीच्या अज्ञान व अल्पवयीन असल्याचा फायदा पती, सासू, सासरे, आई, वडील यांनी घेतला म्हणून वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, याप्रकरणी वडवणी ठाण्यात पीडित मुलीच्या फिर्यादीवरून वडील, आई, सासरे, सासू व पती यांच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन मिरकर करत आहेत.
मुख्य आरोपी कोरोनाबाधित
या प्रकरणातील मुख्य आरोपी पतीस वडवणी पोलिसांनी २६ मार्च रोजी अटक केली असून २७ मार्च रोजी अशोकची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी तो बाधित असल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी क्वारंटाइन झाले आहेत.