मतांसाठी बोली लावणाºया सात जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 08:04 PM2017-09-20T20:04:25+5:302017-09-20T20:05:11+5:30

गेवराई (जि. बीड) तालुक्यातील बंगालीपिंपळा ग्रुप ग्रामपंचायतीत असलेल्या टकलेवाडी येथे बोली लावून ६ लाख ९५ हजार रुपयांत ५०० मतदान विकत घेतल्याप्रकरणी सात जणांवर चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Crime against seven people for bidding for votes | मतांसाठी बोली लावणाºया सात जणांवर गुन्हा

मतांसाठी बोली लावणाºया सात जणांवर गुन्हा

Next
ठळक मुद्देबंगाली पिंपळा ग्रा.पं. निवडणूकनिवडणूक विभागाकडे केली होती तक्रार

गेवराई  (जि. बीड) : तालुक्यातील बंगालीपिंपळा ग्रुप ग्रामपंचायतीत असलेल्या टकलेवाडी येथे बोली लावून ६ लाख ९५ हजार रुपयांत ५०० मतदान विकत घेतल्याप्रकरणी सात जणांवर चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सध्या जोरात सुरु आहे.  टकलेवाडी येथील इच्छुक उमेदवार तुकाराम तळतकर यांनी ६ लाख ९५ हजार रुपये देऊन ५०० मतदान विकत घेतले असल्याची लेखी तक्रार येथील उपसरपंच अशोक खरात यांनी निवडणूक विभागाकडे पुराव्यासह केली होती. याची दखल घेत चौकशीसाठी तहसीलदार संजय पवार, नायब तहसीलदार अशोक  भंडारे, संतोष देशमुख, मंडळाधिकारी काशीद यांच्यासह पोलीस बंदोबस्तात  दाखल झाले. चौकशीदरम्यान सात जण दोषी आढळले. या प्रकरणी येथील तुकाराम तळतकर, महादेव करांडे, कैलास टकले, मसू टकले, नवनाथ सोलनकर, अशोक गव्हाणे, संदीप टकले या सात जणांवर चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मंदिरात लावली बोली
५ सप्टेंबर रोजी मारुतीच्या मंदिरात सर्वाेच्च बोली लावलेली रक्कम समारंभपुर्वक देण्यात आली होती. नंतर ६ सप्टेंबर रोजी मसू टकले, नवनाथ सोलनकर, अशोक गव्हाणे, संदिप टकले यांच्या नावावर महाराष्ट्र ग्रामीण बॅक कोळगाव येथे ६ लाख ९५ हजार रूपये एवढी रक्कम जमा केली होती. हा चौकशीतील मुख्य पुरावा ठरला. त्यानुसार गुन्हा दाखल केला असल्याचे नायब तहसीलदार अशोक भंडारी यांनी सांगितले.

Web Title: Crime against seven people for bidding for votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.