सोनीमोहा सोसायटीच्या संचालकांसह तीन बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:35 AM2021-05-07T04:35:57+5:302021-05-07T04:35:57+5:30
धारूर : तालुक्यातील सोनीमोहा सेवा सोसायटीत संगनमताने नियमबाह्य कर्ज वाटप केले. याप्रकरणी सहकार विभागाचे सहायक निबंधक यांच्या तक्रारीवरुन धारूर ...
धारूर : तालुक्यातील सोनीमोहा सेवा सोसायटीत संगनमताने नियमबाह्य कर्ज वाटप केले. याप्रकरणी सहकार विभागाचे सहायक निबंधक यांच्या तक्रारीवरुन धारूर पोलिसांनी सोसायटीच्या संचालकांसह बीड जिल्हा बँकेच्या तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सोनीमोहा सेवा सोसायटीवर मार्च २०१९ मध्ये प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. प्रशासक नेमल्यामुळे या सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त झाले होते. असे असताना जिल्हा बँकेचे संचालक, सोनीमोहा सेवा सोसायटीचे सर्व संचालक तसेच जिल्हा बँकेचे कर्मचारी यांनी संगनमत करत चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केले. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी धारूर येथील सहायक उपनिबंधक कार्यालयाकडून पाठपुरावा केला जात होता. ६ मे रोजी सायंकाळी सोसायटीच्या संचालकांसह जिल्हा बँकेतील तीन कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कानिफनाथ पालवे करीत आहेत. आरोपींची नावे शुक्रवारी जाहीर करू, असे पालवे यांनी सांगितले,