खाजगी शिकवणीचालकावर विनयभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:33 AM2021-01-03T04:33:16+5:302021-01-03T04:33:16+5:30
अंबाजोगाई : एकतर्फी प्रेमातून लग्नासाठी मागणी घातल्यानंतर नकार देणाऱ्या युवतीला सोशल मीडियावर सतत अश्लील मेसेज करून त्रास देत विनयभंग ...
अंबाजोगाई : एकतर्फी प्रेमातून लग्नासाठी मागणी घातल्यानंतर नकार देणाऱ्या युवतीला सोशल मीडियावर सतत अश्लील मेसेज करून त्रास देत विनयभंग केल्याप्रकरणी खाजगी शिकवणीचालकावर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बारावी झाल्यानंतर २०१७ साली कल्याण मोरे याच्या खाजगी शिकवणीत तिने दोन महिने नोकरी केली होती. त्या दरम्यान मोरे याने तिला लग्नाची मागणी घातली. पीडितेने नकार दिल्यानंतही मोरेकडून मागणीचा हट्ट सुरूच होता. या त्रासाला कंटाळून पीडितेने क्लासची नोकरी सोडून कुटुंबासह लातूरला शिक्षणासाठी गेली. या त्रासापोटी तिने मोबाईल नंबर बदलला. कल्याणने पीडितेच्या नातेवाईकाकडून तिचा मोबाईल क्रमांक प्राप्त करीत ३१ डिसेंबर रोजी कल्याणने तिला कॉल केला. परंतु, त्याचा आवाज ऐकताच तिने कॉल बंद केला. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर सतत अश्लील मेसेज पाठविले. अखेर त्रासलेल्या पीडितेने शुक्रवारी अंबाजोगाई शहर ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून कल्याण मोरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पो. ना. घोळवे करत आहेत.