केतकी चितळेवर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच; आता अंबाजोगाईत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 02:39 PM2022-05-17T14:39:14+5:302022-05-17T14:41:00+5:30

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल करण्यात येऊन तिला अटक करण्यात आली आहे.

Crimes against Ketki Chitale continue; Now a case has been registered in Ambajogai | केतकी चितळेवर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच; आता अंबाजोगाईत गुन्हा दाखल

केतकी चितळेवर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच; आता अंबाजोगाईत गुन्हा दाखल

Next

अंबाजोगाई (बीड): ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल समाज माध्यमातून आक्षेपार्ह्य पोस्ट केल्या प्रकरणी अडचणीत आलेल्या केतकी चितळे हिच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात  गुन्हा नोंद करण्यात आला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. दरम्यान, आज मंगळवारी (दि.१७) सकाळीच राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी  चितळेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर शरद पवार यांच्याबद्दल फेसबुक आणि ट्वीटरवर आक्षेपार्ह्य, बदनामीकारक आणि मानहानी करणारी पोस्ट केली होती. तसेच, संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा उल्लेख करून बदनामी  केली होती. याचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी देखील याचा निषेध केला. त्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल करण्यात येऊन तिला अटक करण्यात आली. सध्या ती तुरुंगात असून १८ मे पर्यंत तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अजूनही तिच्यावर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरुच आहे. मंगळवारी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांच्या तक्रारीवरून केतकीवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अंबाजोगाईत राष्ट्रवादीचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
दरम्यान, मंगळवारी सकाळी अंबाजोगाई  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, जेष्ठ नेते राजकिशोर मोदी, ताराचंद शिंदे, महादेव आदमाने, अमर देशमुख, तानाजी देशमुख, भिमसेन लोमटे, दत्ता सरवदे, सुधाकर म्हाले, सुगत सरवदे, जावेद गवळी, अकबर पठाण, इश्वर मुंडे यांच्यासह ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Crimes against Ketki Chitale continue; Now a case has been registered in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.