आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:31 AM2021-02-14T04:31:54+5:302021-02-14T04:31:54+5:30
माजलगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात अनेकांच्या घरावरून, तर काहींच्या घरासमोरून या तारा गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण ...
माजलगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात अनेकांच्या घरावरून, तर काहींच्या घरासमोरून या तारा गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. अनेक भागांतील तारा जीर्ण झाल्या असून, महावितरणने या तारा बदलण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
रस्त्यांवरील वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा
अंबाजोगाई : शहरात सावरकर चौक व बसस्थानक परिसरात रस्त्यावरच प्रवासी वाहतुकीची वाहने व ऑटोरिक्षा यांचे पार्किंग केले जाते. अगोदरच हा रस्ता अरुंद असल्याने वाहनांची मोठी वर्दळ या रस्त्यावरून असते. त्यातच प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
रस्ता प्रश्न मार्गी लावावा
माजलगाव : तालुक्यातील जायकोचीवाडी या गावचा रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. जायकोचीवाडी ते खामगाव पंढरपूर डांबरी रस्ता व पाणंद रस्ता अत्यंत बिकट झालेला आहे. या रस्त्याच्या समस्येबाबत निवेदनही दिले आहे; परंतु अद्यापही याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेलेले नाही.
अशुद्ध पाणी पुरवठा
बीड : शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे; मात्र पाइपलाइन फुटल्यामुळे ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याची शक्यता असून, अनेक भागांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कामांचा खोळंबा
गेवराई : तालुक्यातील अनेक ठिकाणच्या तलाठी कार्यालयाच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी इमारती धूळ खात असून महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. सज्जावर तलाठी रहात नसल्याने कामे होईनासे झाली आहेत.