वन्य प्राण्यांच्या भटकंतीमुळे पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:30 AM2021-04-26T04:30:06+5:302021-04-26T04:30:06+5:30
वडवणी : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, कोविड लाॅकडाऊनचा सामना करून नव्या जोमाने शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पेरणी करून काबाडकष्टाने ...
वडवणी : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, कोविड लाॅकडाऊनचा सामना करून नव्या जोमाने शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पेरणी करून काबाडकष्टाने पिके रूजविली. मात्र वन्य प्राण्यांची पाण्याच्या शोधात भटकंती वाढल्याने लागवड केलेल्या पिकांची नासाडी होत आहे.
तालुक्यातील देवडी, कवडगाव, मामला, चिंचोटी, हरिश्चंद्र पिंपी, मोरवड, हिवरगव्हाण, बाहेगव्हाण, चिंचवडगाव, पुसरा, तिगाव, दुकडेगाव, चिंचाळा, पिंपरखेड ग्रामीण भागात वन्य प्राण्यांची भटकंती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. पक्षी, प्राण्यांसाठी ठिकठिकाणी पाणवठे उभारण्याची गरज आहे. ज्या भागात पाणवठे बनविले आहेत, ते आजही कोरडेठाक पडल्याने वन्य प्राण्यांचा संचार लोकवस्तीकडे दिवसेंदिवस वाढत आहे.याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. काबाडकष्टाने टरबूज, टाळी, खरबूज, ज्वारी, भुईमुग, मका पिकांचे नुकसान होत आहे. ठिकठिकाणी हरिण, काळवीट, वानर, रानडुकरे धुमाकूळ घालत आहेत. तत्काळ वडवणी तालुक्यातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
फोटो ओळी : तालुक्यातील मौजे चिंचोटी येथील शेतकरी सुमंत गोंडे यांच्या शेतात रानडुकराने बाजरीचे उभे पीक आडवे केले आहे.
===Photopath===
250421\rameswar lange_img-20210425-wa0010_14.jpg~250421\rameswar lange_img-20210425-wa0011_14.jpg