३५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:40 AM2021-09-09T04:40:25+5:302021-09-09T04:40:25+5:30

वडवणी : तालुक्यात गेल्या सहा दिवसांपासून झालेल्या पावसाने शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . दोन महसूल ...

Crop damage over 35,000 hectares | ३५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

३५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Next

वडवणी : तालुक्यात गेल्या सहा दिवसांपासून झालेल्या पावसाने शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . दोन महसूल मंडळात एकूण सरासरी ७०१ पेक्षा जास्त पर्जन्यमान झाले आहे. मंगळवारी कवडगाव मंडळात १२० मिमी तर वडवणी मंडळात १०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वडवणी तालुक्यात कापूस १८ हजार ४०१ हेक्टर तर सोयाबीन ४ हजार १०८ हेक्टर, बाजरी ३ हजार ५९५ हेक्टर, तूर ८६९ हेक्टर, मूग २३५ हेक्टर तर जवळपास ८ हजार हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली होती. संपूर्ण क्षेत्रावरील पिकांचे १०० टक्के नुकसान झाली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील ३५ हजार २०८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गर्जे यांनी सांगितले.

अतिवृष्टीत शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, विमा प्रतिनिधींनी संयुक्तपणे पाहणी करून पंचनामे करून अहवाल सादर करण्यास सूचना दिल्या आहेत. पंचनामे सुरू आहेत. आणखी अतिवृष्टीचा इशाऱ्यानुसार नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्क राहण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

-प्रकाश सिरसेवाड, तहसीलदार.

...

अतिवृष्टीत होत्याचे नव्हते झाले आहे. सरकारने तत्काळ नुकसान भरपाई देण्यात द्यावी.

-नवनाथ बादाडे, शेतकरी, वडवणी.

080921\rameswar lange_img-20210908-wa0015_14.jpg~080921\rameswar lange_img-20210908-wa0016_14.jpg

Web Title: Crop damage over 35,000 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.