पिकविम्याची अग्रिम रक्कम तातडीने जमा करावी - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:34 AM2021-09-11T04:34:06+5:302021-09-11T04:34:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी, अशी मागणी केजच्या आमदार नमिता मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन केली.
दरम्यान, इकडे बीडमध्ये ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी भारतीय कृषी विमा कंपनीचे बीड जिल्हा प्रतिनिधी इनकर, कृषी अधीक्षक जेजुरकर यांची भेट घेऊन पिकविम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली. एकाच वेळी संपूर्ण मुंदडा कुटुंब शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुंबई आणि बीड येथे प्रयत्नशील असल्याचे दिसून आले.
...
कृषी सचिवांचीही घेतली भेट
आमदार मुंदडा यांच्या मागण्यांची दखल घेत कृषिमंत्र्यांनी कृषी सचिवांसोबत फोनद्वारे संपर्क साधला. त्यानंतर आ.मुंदडा यांनी कृषी खात्याचे सचिव डवले यांचीही भेट घेऊन पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्याची विनंती केली. येत्या दहा दिवसांच्या आत पीक विम्यातील राज्य शासनाच्या वाट्याची रक्कम जमा करण्यात येईल आणि त्यानंतर अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती डवले यांनी दिली. याचप्रश्नी आ.मुंदडा यांनी बुधवारी भारतीय कृषी विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापक शेट्टी यांचीही भेट घेतली होती.