बीड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:37 AM2021-09-23T04:37:55+5:302021-09-23T04:37:55+5:30
बीड : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून उघडीप न मिळाल्याने पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...
बीड : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून उघडीप न मिळाल्याने पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी बीडसह माजलगाव, अंबाजोगाई, गेवराई, आष्टी, केज, परळी, शिरूर आणि धारूर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. कुठे सडाका तर कुठे संततधार पाऊस झाला. बुधवारी सकाळी ९ वाजेपर्यंत मागील २४ तासांत जिल्ह्यात २३.९ मिमी एकूण पाऊस नोंदला. बीड तालुक्यात २१.३, पाटोदा १३.९, आष्टी ७.८, गेवराई ४३.२, माजलगाव २५.७, अंबाजोगाई २२.४, केज १५.८, परळी २५.७, धारूर २७.८, वडवणी ३६.८ तर शिरूर कासार तालुक्यात २२ मिमी पाऊस झाला. १ जून ते २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण ८१३ मिमी पाऊस झाला आहे.