बहुतांश शेतकऱ्यांची पिके धोक्यात, तत्काळ पंचनामे करून २५ टक्के अग्रिम रक्कम द्यावी: धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 04:52 PM2022-09-02T16:52:47+5:302022-09-02T16:53:04+5:30

हजारो हेक्टर शेती अक्षरशः सुकून गेली असून, माना टाकलेली, शेंगा वाळलेली सोयाबीन बघून वाईट वाटत आहे.

Crops of most farmers in danger, Panchnama should be done immediately and 25 percent advance should be paid: Dhananjay Munde | बहुतांश शेतकऱ्यांची पिके धोक्यात, तत्काळ पंचनामे करून २५ टक्के अग्रिम रक्कम द्यावी: धनंजय मुंडे

बहुतांश शेतकऱ्यांची पिके धोक्यात, तत्काळ पंचनामे करून २५ टक्के अग्रिम रक्कम द्यावी: धनंजय मुंडे

Next

अंबाजोगाई -: बीड जिल्ह्यात मागील चार आठवड्यांपेक्षा अधिक काळात, पिके ऐन जोमात आल्यानंतर पावसाने मोठी उघडीप दिल्याने सोयाबीन, कापूस यासह बहुतांश पिके धोक्यात आली आहेत. हजारो हेक्टर शेती अक्षरशः सुकून गेली असून, माना टाकलेली, शेंगा वाळलेली सोयाबीन बघून वाईट वाटत आहे. ही परिस्थिती बीड जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मागील वर्षी दिले त्याप्रमाणे धोक्यात आलेल्या सर्व पिकांना विमा संरक्षित रकमेच्या किमान २५ टक्के अग्रिम विमा मंजूर करून वितरित करावा, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार कडे केली आहे. 

धनंजय मुंडे यांनी आज अंबाजोगाई तालुक्यातील मुरकूटवाडी येथील सुकून गेलेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली. दोनही डोळ्यांनी अंध असलेल्या सुनील मुरकुटे यांच्या शेतातील सोयाबीन पाहणी करताना, सुकलेली सोयाबीन, ऐन बहरात वाळून गेलेल्या शेंगा अशी विदारक परिस्थिती पाहून चिंता व्यक्त केली. 

दोनही डोळ्यांनी अंध असलेल्या सुनील मुरकुटे यांच्या समोर संकटांचा डोंगर उभा असून, अशीच विदारक परिस्थिती जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची झाली आहे. या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असून राज्य शासनाने प्रशासनाला व संबंधित विमा कंपन्यांना आदेशित करून तातडीने धोक्यात आलेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून मागील वर्षी प्रमाणे किमान २५ टक्के अग्रिम रक्कम मंजूर करून तातडीने वितरित करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकार कडे केली आहे. तसेच याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

यावेळी माजी आ. संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. गोविंद फड, राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदारसंघ प्रमुख गोविंद देशमुख, शिवहार भताने गुरुजी, नागनाथ महाराज मुरकुटे, अय्युब भाई शेख, बबन मुंडे, सीताराम हाडबे, सायस मुरकुटे, चंद्रकांत गायकवाड, माऊली गायकवाड, राहुल गायकवाड, कैलास गायकवाड, बापू राऊत यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Crops of most farmers in danger, Panchnama should be done immediately and 25 percent advance should be paid: Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.